शरद पवार यांचा 'पॉवर गेम'; महाराष्ट्रात अनेकांच्या दांड्या गुल, भलेभले चितपट, पंतप्रधान मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्या आक्रमक राजकारणाला लगाम
Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

Maharashtra Government Formation: अखेर हो.. नाही.. करत करत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस (Sena-NCP-Congress Alliance) या तिन्ही पक्षांची आघाडी स्थापन होणे आणि सत्तास्थापने नजीक आली. राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक आणि माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्ली येथे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन तसे सुतोवाच केले. या तिन्ही पक्षांचे सरकार महाराष्ट्रात अद्याप स्थापन झाले नाही हे खरे. पण, त्या दिशेने पावले तरी गतीमानपणे पडायला सुरुवात झाली. या राजकीय वर्तुळात काहीशा अनैसर्गिक अशा आघाडीकडे आतापासूनच आश्चर्य आणि संशयाने पाहने आतापासूनच सुरु झाले आहे. त्यात शिवसेना ( Shiv Sena) मित्रपक्ष भाजप (BJP) आघाडीवर आहे. या सगळ्यामुळे या घडामोडी आणि प्रयोगाचा कर्ता करवता मानले गेलेले नेते शरद पवार (Sharad Pawar) हे राज्य आणि देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चेच्या सर्वोच्च स्थानी पोहोचले आहेत. शरद पवार यांच्या या खेळीला तर राजकारणातील पवार यांचा 'पॉवर गेम' (Sharad Pawar Power Game) म्हणून बघितले जात आहे. आपल्या खेळीने महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकांच्या दांड्या गुल आणि भलेभले चितपट झाल्याचे बोलले जाऊ लागले आहे. जाणून घ्या शरद पवार यांनी असे नेमके काय केले?

देवेंद्र फडणवीस यांच्या अती आत्मविश्वसाच्या फुग्याला टाचणी

असे म्हटले जाते की माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांचे एकूण वय 49 वर्षे तर शरद वार यांची एकूण राजकीय कारकीर्द 58 वर्षांची आहे. त्यामुळे राजकारणाच्य खेळात देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना नको त्या पद्धतीने अंगावर घेतले होते. त्यात भाजपचे पैलवान अंगाला तेल लाऊन मैदानत आहेत मात्र समोरुन आमच्या विरोधात पैलवानच नाही, असे म्हणून शरद पवार यांना क्षुल्लक लेखण्याचा प्रयत्न फडणवीस यांच्याकडून झाला. फडणवीस यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केलेला नटरंग हा उल्लेख, तसेच, भाजपकडून महाराष्ट्राच्या राजकारणातून 'आता पवार पॅटर्न बाद होणार' अशी केलेली संभावना शरद पवार यांच्या जिव्हारी लागली. त्यामुळे शरद पवार इरेला पेटले. त्यांनी करुन दाखवले. विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधीपसूनच देवेंद्र फडणवीस यांनी 'मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन' असा घोशा लावला होता. त्याल पवार यांनी असा काही ब्रेक लावला की, फडणवीस तोंडावर पडले.

Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्या आक्रमक राजकारणाला लगाम

मिझोराम, गोवा, कर्नाटक या राज्यांचा विचार करता भाजप आणि पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खास करुन भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी आक्रमक राजकारमाचा वापर केला. त्यात त्यांना यशही आले. महाराष्ट्रातही असाच प्रयोग करण्याच्या विचारात असतानाच शरद पवार यांनी थेट मैदानात उतरुन सामना लढला. या त्यांना काँग्रेस या मित्रपक्षाचीही म्हणावी तशी साथ लाभली नाही. तरीही विधानसभा निवडणुकीचा सामना एकहाती लढवत पवार यांनी मोदी शाह यांच्या आक्रमक राजकारणाला लगाम घातला. त्यामुळे सत्तेच्या जादूई आकड्यावळ पोहोचायला आवश्यक असणारे 30 ते 35 आमदार मिळवणे भाजपला अशक्य होऊन बसले. परिणामी 105 जागा जिंकून प्रथम क्रमांकाचा पक्ष असूनही भाजपला महाराष्ट्रात सत्तेवर पाणी सोडावे लागले.

राष्ट्रीय पातळीवरही भाजप पर्यायाने एनडीए अडचणीत

महाराष्ट्रात भाजपला आव्हान मिळाले त्याचे राष्ट्रीय राजकारणातही पडसाद उमटले. खास करुन शिवसेना या एनडीएच्या संस्थापक घटक पक्षाने आणि भाजपच्या 25 वर्षांच्या मित्रपक्षाने अशा प्रकारे भाजपला उडवून लावल्याने एनडीएती इतर घटक पक्षांनीही भाजपला हिसका दाखवण्यास सुरुवात केली आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे झारखंड राज्यात आजसू आणि रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाने भाजपसोबत न जाता विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एनडीएतील तीन घटक पक्षांनी भाजपची साथ सोडल्याचे चित्र राष्ट्रीय राजकारणात निर्माण झाले. (हेही वाचा, या 5 मुद्द्यांवर जाहीर चर्चा करायला राजकीय नेते घाबरतात; गल्ली ते दिल्ली कोणीच बोलत नाही)

Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

दबावाचे राजकारण झुगारुन दिले

विधानसभा निवडणूक प्रचाराला नुकतीच सुरुवात झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप अध्यक्ष अमित शाह आणि केंद्रातील मंत्र्यांची फळीच्या फळी महाराष्ट्रात भाजप प्रचारासाठी दाखल होऊ लागली होती. भाजपने निवडणूक प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केले होते. यातून शरद पवार यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. यात भ्रष्टाचार, घराणेशाही ते विकासाचे विरोध अशा मुद्द्यांचा समावेश होता. मात्र, एका जाहीर सभेत बोलताना बाकी काही असले तरी, आपण कोणत्याही गुन्ह्यात तुरुंगात गेलो नाही. देशाच्या विद्यमान गृहमंत्री तुरुंगाची हवा खाऊन आले आहेत, असा पलटवार पवार यांनी अमित शाह यांच्यावर केला. भाजपसाठी हा मोठा तडाखा होता. झाले.. अल्पावधीत महाराष्ट्र बँक (शिखर बँक) प्रकरणी शरद पवार यांना अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) कार्यालयाची नोटीस आली. दबावाचे राजकारण केल्याचे बोलले जाऊ लागले. पण, पवार दबावाला झुकले नाहीत. त्यांनी अंमलबजावणी संचालनालय कार्यालयालच अंगावर घेतले. इडीची नोटीस नाही पण आपणच ईडी कार्यालयात जाऊन चौकशीला सामरे जात असल्याचे जाहीर केले. पवारांच्या दूरदर्शीपणाचा हा सर्वोच्च बिंदू होता. अखेर अंमलबजावणी कार्यालायाला स्पष्टीकरण द्यावे लागले. की पवार यांनी कार्यालयात येण्याची गरज नाही. प्रसारमाध्यमांतून दिवसभर हा विषय चर्चेत राहिला. यातून संदेश गेला दबाावचे राजकारण झुगारुन लावता येते.

Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

शरद पवार हे भारतीय राजकारणातील आज घडीचे पुराने खेळाडू आहेत. अनेकदा त्यांचे राजकारण बेभरवशाचे राहिले आहे. पण, जेव्हा जेव्हा पवार यांना आव्हान मिळाले आहे तेव्ह तेव्हा पवार यांनी भल्याभल्यांना अंगावर घेतले आहे. मग, ते वसंत दादा पाटील यांचे कोसळलेले सरकार असो, पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासोबत झालेला संघर्ष असो, सोनिया गांधी यांना केलेले विरोध असो अथवा बीसीसीआय अध्यक्ष पद निवडणुकीत जगमोहन दालमिया यांच्यासोबत उडालेला संघर्ष असो. पवारांनी भल्याभल्यांना चितपट केले आहे.