माता-बालक पोषण आहारात साप (Snake Found In ICDS scheme Nutrition) आढळल्याचा धक्कादायक प्रकार सांगली (Sangli) जिल्ह्यातील पलूस (Palus ) तालुक्यामध्ये पुढे आला आहे. महाराष्ट्र शासन एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत गर्भवती माता आणि बालकांना पोषण आहार वाटप करते. या आहारात चक्क एक मृत वाळा आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारबद्दल राज्य सरकार आणि प्रशासनावर टीकेची झोड उडाली आहे. अलिकडेच एका डॉक्टरांना आईस्क्रीममध्ये चक्क मानवी बोट आढळून आले होते. हे बोट पुणेस्थिती कारखान्यात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचे असल्याची धक्कादायक माहिती DNA चाचणीमध्ये पुढे आली. त्यानंतर पोषण आहाराची घटना पुढे आली आहे.
आहाराच्या वेष्टनात बदल
महाराष्ट्र शासन पाठिमागील अनेक वर्षांपासून एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत गर्भवती माता व सहा महिने ते तीन वर्ष लहान बालकांना पोषण आहार पुरवत आहे. आगोदर या आहारात गहू, तांदूळ, हरभरा, तिकट, मीठ आणि विविध प्रकारच्या डाळींचा समावेश असे. मात्र, एप्रिल महिन्यात काहीसा बदल करत डाळ, तिखट-मीठ एकत्र करुन आणि गव्हाचे पीठ, साखर हेसुद्धा एकत्रच करुन दिला जात आहे. नवीन कंपनीस हा ठेका देण्यात आला असून आहारात बदल झाल्याचे सांगितले जात आहे. अलिकडेच हा आहार पलूस बिटला पोहोचविण्यात आला. हेही वाचा, (हेही वाचा - Snake Found in Pune Hotel: पुण्यातील डीपी रोडवरील एका हॉटेलमध्ये आढळला साप; जेवण करण्यासाठी आलेल्या नागरिकांचा उडाला गोंधळ(Watch Video))
दरम्यान, कृषिनगर अंगणवाडी क्रमांक 116 येथून येथील लाभार्थी शिरीष याच्यासाठी त्याचे आजोबा माझी सैनिक सुभाष निवृत्ती जाधव यांनी आहार घरी नेला. त्या वेळी पाकीट फोडले असता त्या आहाराच्या पिशवीत चक्क लहान आकाराचा साप आढळून आला. त्यांनी तातडीने अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधला आणि घडल्या प्रकाराची माहिती दिली. अंगणवाडी सेविकेने राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष आनंदी भोसले यांच्याशी संपर्क साधून ही बाब त्यांच्या कानावर घातली. त्यानंतर संबंधित लाभार्थ्याशी संपर्क साधून दिलेला पोषण आहार परत जमा करुन घेतला. दरम्यान, घडल्या प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे. (हेही वाचा, आईस्क्रीममध्ये सापडलेला बोटाचा तुकडा पुणे येथील कर्मचाऱ्याचा, DNA चाचणीत धक्कादायक खुलासा; डॉक्टरांचा दावा खरा)
व्हिडिओ
बालके, गरोदर व स्तनदा माता, किशोरवयीनांना पोषण आहार
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमार्फत 6 महिने ते 6 वर्षे वयोगटातील बालके, गरोदर व स्तनदा माता, किशोरवयीन मुली-मुले यांना पूरक पोषण आहार देण्यात येतो. त्यामध्येही 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर व स्तनदा माता, किशोरी मुली यांना स्थानिक स्तरावर बचत गटांमार्फत उत्पादित घरपोच आहार (Take Home Ration - THR) देण्यात येतो. 3 वर्षे ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना अंगणवाडी मध्ये बचत गटाने तयार केलेला गरम ताजा आहार देण्यात येतो. याच योजनेच्या माध्यमातून पलूस येथील अंगणवाडीमधून गर्भवती महिला आणि बालकांना पोषण आहार वाटप करण्यात आले होते. ज्यामध्ये ळ,तांदूळ ,तिखट,मीठ एकत्र असलेल्या एका पाकीटात मेलेला वाला आढळून आला.