Rahul Gandhi Political Career: राहुल गांधी, देशभरातील युवक, युवती, महिला आणि लहानथोरांना एकाच वेळी भूरळ घालणारे नाव. भारताच्या राजकारणात क्षेत्र कोणतेही असो. अपवाद वगळता प्रत्येक व्यक्तीला जे काही मिळते ते वारशाच्या रुपातच. मग तो उद्योगधंदा, व्यवसाय असो की राजकारण. राहुल गांधी (Rahul Gandhi Birthday) यांनाही राजकीय वारसा वारशाच्या रुपातच मिळाला. सहाजिकच भारतच नव्हे तर जगभरातील लोक, माध्यमं आणि अभ्यासकांना वाटले की, राहुल गांधी हेच आता भारताचे पंतप्रधान होणार. खास करुन तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान पद स्वखुशीने नाकारले. खास करुन पंतप्रधान पद नाकारुन जेव्हा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी राहुल गांधी यांना राजकीय मैदानात उतरवले. तेव्हा अनेकांना खात्री होती की, अर्थतज्ज्ञ असलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंह यांना बाजूला करुन काँग्रेस राहुल गांधी यांना त्या पदावर आणतील. पण घडले उलटेच. पंतप्रधान पद तर सोडाच. पण केंद्रात साधे मंत्रिपदही राहुल गांधी (Rahul Gandhi Journey of a Struggle) यांनी घेतले नाही. अखेर पक्षातीलच धुरीणांच्या आग्रहामुळे त्यांना काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे लागले. पुढे राहुल गांधी यांचे येथेच्छ प्रतिमाहनन झाले. कंधी कौटुंबीक हल्ले, कधी 'पप्पू' म्हणून हिनवणे तर कधी थेट आई, वडील आणि आजोबांवरही अत्यंत गलिच्छ टीका. विरोधकांनी केलेल्या या टीकेने राहुल गांधी यांची प्रतिमा मलिन झाली. पण, या सर्व घडामोडींतून राहुल गांधी ताऊनसुलाखून बाहेर पडले. त्याच राहुल गांधी यांचा आज 53 वा वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त राहुल गांधी यांचे शिक्षण, काँग्रेस अध्यक्ष, भारत जोडो यात्रा, पराभव, शिक्षण आणि राजकीय करिअर अशा वेगवेगल्या भूमिकांतून सुरु राहिलेल्या संघर्षाच्या प्रवासाचा हा एक अल्पसा आढावा.
राहुल गांधी शिक्षण
राहुल गांधी यांनी सुरुवातीचे शिक्षण दिल्ली आणि डेहराडून येथे घेतले. मात्र, सुरक्षेच्या कारणावरुन त्यांना 'होमस्कुलींग' निवडावे लागले. पुढे त्यांनी सेंट स्टीफन कॉलेजमधून पदवी पूर्ण केली आणि नंतर हार्वर्ड विद्यापीठ गाठले. हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर राहुल गांधी फ्लोरिडा येथील रोलिन्स कॉलेजमध्ये दाखल झाले आणि तेथून त्यांनी 1994 मध्ये पदवी प्राप्त केली आणि पुढील वर्षी त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून एम.फिल पदवी प्राप्त केली. (हेही वाचा, 'Now I Am A Common Man' राहुल गांधी यांच्या उद्गारांनी जिंकली उपस्थितांची मने)
1995 मध्ये राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी कॉलेजमधून डेव्हलपमेंटल स्टडीजमध्ये एम.फिल पदवी प्राप्त केली. राजकारणात येण्यापूर्वी राहुल गांधी यांनी लंडनमधील मॅनेजमेंट कन्सल्टिंग फर्म मॉनिटर ग्रुपमध्ये काम केले, अशी माहिती प्रसारमाध्यमे आणि इतर सार्वजनिक स्त्रोतांतून उपलब्ध होते. राहुल यांनी मुंबई स्थित एका कंपनीसोबतही काम केल्याचे सांगितले जाते.
राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष
तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान पद नाकारल्यानंतर सर्वांनाच वाटले होते की, राहुल गांधी हे पंतप्रधान होतील. पण राहुल गांधी पंतप्रधान झाले नाहीत. त्यांनी ते पद स्वीकारले नाहीत. दरम्यान, ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मात्र झाले. मात्र, काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांना विशेष प्रभावी काम करता आले नाही. काँग्रेस अत्यंत आळसावलेल्या आणि गलितगात्र झालेल्या अवस्थेत त्यांच्याकडे आली. (हेही वाचा, Rahul Gandhi On Rajiv Gandhi: 'पापा, आप मेरे साथ ही हैं', राजीव गांधी यांच्या आठवणीत राहुल गांधी भावूक; सोशल मीडियावर शेअर केला Video)
परिणामी त्यांना सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते पद पुन्हा त्यांच्या मातोश्रींकडे आले. मात्र, काँग्रेसची डुबती नौका किनाऱ्याला लागलीच नाही. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात अनेक निवडणुका काँग्रेसने हारल्या. मात्र, राहुल गांधी यांनी 'भारत जोडो यात्रा' काढली आणि काँग्रेसचे दिवस बदलू लागल्याचे पुढे आले.
भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra):
राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra:) दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यातील कन्याकुमारी येथून सुरु झाली आणि जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे संपली. ही यात्रा साधारम पाच महिने चालली. ज्यात 4,000 किमी (2,485-मैल) अंतर पायी कापले गेले. देशातील एक मोठा समूदाय यात्रेकडे खेचला गेला. ज्याला अनेक सेलिब्रिटींनी याला पाठिंबा दिला.
या यात्रेमुळे सत्ताधारी खास करुन भाजप आणि भाजपशी संलग्नीत विविध संघटनांनी मलीन केलेली राहुल गांधी यांची प्रतिमा उजळून निघाली. खास करुन तत्कालीन विरोधक आणि विद्यमान सत्ताधारी यांच्याकडून राहुल गांधी यांची केली जाणारी 'पप्पू' अशी हेटाळणी पुसली गेली. राहुल गांधी यांनी या यात्रेचा उद्देश सांगताना म्हटले की, ही यात्रा म्हणजे तीरस्काराच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडणे आहे. ज्याद्वारे देश जोडला जाईल.
राहुल गांधी यांचा संघर्ष ते राजकारणात आले तेव्हापासून सुरुच आहे. राहुल गांधी हे उच्चविद्याविभूषीत असले तरी सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक चुका केल्या आहेत. जो एखादा कसलेला राजकारणी कधीच करणार नाही. कदाचित याला त्यांचे सल्लागारही कारणीभूत असू शकतात. यात प्रामुख्याने कोणताही अभ्यास न करता प्रसारमाध्यमांना मुलाखत देणे. प्रभावी वक्तृत्वशैली आत्मसात न करणे. विविध ठिकाणी भाषण करताना भैगोलिक स्थिती, प्रदेश आणि जनसमुदाय यांचा विचार न करता कंटाळवाणे भाषण करणे, यांसारख्या गोष्टींचा समावेश करता येईल. परंतू, भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी यांचा नवाच अवतार पाहायला मिळत आहे. आता ते भारताचे नेतृत्व करु शकतील इतके अश्वासक वाटत आहेत. त्यामुळे देशातील नागरिकांच्या आपेक्षाही त्यांच्याकडून वाढल्या आहेत. या जबाबदाऱ्या पेलताना काळाच्या कसोटीवर राहुल गांधी किती टीकतात याबाबत उत्सुकता आहे.