'Now I Am A Common Man' राहुल गांधी यांच्या उद्गारांनी जिंकली उपस्थितांची मने
Rahul Gandhi | (Photo Credit- Twitter)

Rahul Gandhi says In US' at San Francisco: 'भारत जोडो यात्रा' (India Jodo Yatra) केल्यानंतर काँग्रेस (Congress ) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची प्रतिमा देश आणि जगभरात उजळून निघाली आहे. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी यांच्यातही एक नवा आत्मविश्वास संचारल्याचे पाहायला मिळत आहे. जेणेकरुन अनेक आव्हाने येऊनही राहुल गांधी यांचा संयम ढळत नाही. उलट त्या आव्हानांचा सामना ते खंबीरपणे करु लागल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को (Rahul Gandhi says In US' at San Francisco) येथेही राहुल गांधी यांचा असाच काहीसा अंदाज पाहायला मिळाल.

राहुल गांधी हे मंगळवारी तीन शहरांच्या यूएस दौऱ्यासाठी येथे आले. या दौऱ्यात त्यांनी भारतीय प्रवासी लोकांसोबत संवाद साधणार असून ते अमेरिकन खासदारांचीही भेट घेणार आहेत. दरम्यान, इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा आणि आयओसीच्या इतर सदस्यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. राहुल गांधींना इमिग्रेशन क्लिअरन्ससाठी विमानतळावर दोन तास थांबावे लागले, अशी माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली. (हेही वाचा, Rahul Gandhi On Rajiv Gandhi: 'पापा, आप मेरे साथ ही हैं', राजीव गांधी यांच्या आठवणीत राहुल गांधी भावूक; सोशल मीडियावर शेअर केला Video)

दरम्यान, राहुल गांधी इतर नागरिकांप्रमाणे रांगेत उभे होते. या वेळी विमानातील अनेक सहप्रवाशांनी राहुल गांधी यांच्यासोबत सेल्फी काढले, संवाद साधला. नेहमी विशेष सेवेत असणारा हा व्यक्ती आज रांगेत कसा? हा प्रश्न अनेकांना पडला. या वेळी काहींनी राहुल गांधी यांना विचारलेही. आपण रागंते कसे? यावर राहुल गांधी म्हणाले, 'मी आता खासदार नाही. सामान्य व्यक्ती आहे. त्यामुळे रांगेत उभा आहे आणि असे राहणे मला आवडते.'

ट्विट

राहुल गांधी भेटीगाठींना सॅन फ्रान्सिस्कोपासून सुरुवात करतील. पुढे ते प्रतिष्ठित स्टॅनफोर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. नंतर ते पत्रकार परिषदेला संबोधित करतील आणि वॉशिंग्टन डीसीमध्ये कायदेतज्ज्ञ आणि थिंक टँक यांच्याशी बैठका घेतील.

दरम्यान, 52 वर्षीय काँग्रेस नेते राहुल गांधी हे भारतीय अमेरिकन लोकांना संबोधित करण्याची आणि यूएसएच्या आठवड्याभराच्या दौऱ्यात वॉल स्ट्रीटचे अधिकारी आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. 4 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये सार्वजनिक मेळाव्याने ते त्यांच्या सहलीचा समारोप करणार आहेत. हा संवाद न्यूयॉर्कमधील जाविट्स सेंटरमध्ये होणार आहे.