Ola-Uber : पुण्यात ओला-उबरला ‘आरटीए’चा धक्का; वाहतूक परवाना फेटाळला
ओला, उबरचा वाहतूक परवाना पुण्यात ‘आरटीए’ने फेटाळला आहे. त्यामुळे ओला , उबरची वाहतूक करणाऱ्यांना ‘आरटीए’ने जोरदार धक्का दिल्याचे समजते आहे. या विरोधात अपील करण्यासाठी आरटीएकडून 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
Ola-Uber : पुण्यात ‘आरटीए’ने ओला (OLA), उबर ( Uber )ची वाहतूक करणाऱ्यांना जोरदार धक्का दिला आहे. ‘आरटीए’ने (Pune Regional Transport Authority)ओला, उबरचा वाहतूक परवाना फेटाळला आहे. शहरातंर्गत प्रवासी वाहतुकीसाठी ॲग्रीगेटरचा परवाना मिळावा, यासाठी ओला आणि उबर या कॅब कंपन्यांनी अर्ज केला होता. तो अर्ज प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीए) फेटाळला आहे. मात्र, पुण्यात त्यांना प्रवासी वाहतूक सुरू ठेवता येणार आहे. दोन्ही कॅब कंपन्यांच्या कामाच्या नियमावली आणि आरटीएची नियमावसी यात तफावत होती. अरटीएच्या सेंट्रल मोटर व्हेईकल ॲग्रीगेटर पॉलिसी 2020 अंतर्गत पार्टनर कॅब चालकांचा आरोग्य विमा काढणे, त्यांचा जीवनविमा काढणे, त्यांना नियमितपणे प्रशिक्षण देणे, कॅबचालकांना सलग 12 तासांनंतर त्यांना वाहतूक करता येणार नाही. यासाठी तांत्रिक बंधन घालणे या विविध तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल दोन्ही कॅब कंपन्यांचा ॲग्रीगेटरचा परवाना मिळावा, यासाठीचा अर्ज फेटाळला आहे. या निर्णयाच्या विरोधात दोन्ही कॅब कंपन्यांना 30 दिवसांत राज्य वाहतूक प्राधिकरनाकडे अपिल करता येणार आहे. (हेही वाचा :Pune News : पुणे विद्यापीठाचा हलगर्जीपणा पुन्हा चव्हाट्यावर; मेसच्या पोह्यांमध्ये अळी तर उपीटमध्ये आढळले केस )
दोन्ही कंपन्यांचे अर्ज प्रादेशिक परिवहन प्राधिकरणासमोर 11 मार्च 2024 रोजीच्या बैठकीत पुनर्विलोकनानंतर उचित निर्णयासाठी सादर करण्यात आले होते. मात्र, ते मोटार व्हेईकल अॅग्रीगेटर गाईडलाईन्स, 2020 मधील तरतूदीची पूर्ण पूर्तता करीत नसल्याचे आढळल्याने दोन्ही अर्ज नाकारण्यात आले. पुण्यासह इतर शहरातदेखील ओला, उबेर टॅक्सी मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. अनेकांना ही टॅक्सी सोयीची ठरते. त्यामुळे अनेकजण ओला- उबेर टॅक्सीवा प्राधान्य देत असतात. शहरात 75 टक्के लोक ओला उबेरचा वारत करतात. त्यासोबतच बाकी काही 5 कंपन्यांकडून ही ओला- उबेरसारखी सेवा पुरवली जाते. मात्र त्यांनी कोणत्याही प्रकरचा परवाना काढण्यासाठी आरटीएकडे अर्ज केला नसल्याचं दिसून आलं आहे. (हेही वाचा : Pune Crime News: वर्गात क्षुल्लक कारणांवरून भांडण झाल्याने 10 वीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण, कात्रज येथील चौघांवर गुन्हा दाखल)
ओला उबेर चालकांचा परवाना आरटीएने जरी फेटाळला असला तरीही प्रवाशांची मात्र गैरसोय होणार नाहीये. अपीलीमध्ये 30 दिवसांची मुदत देण्यात आहे. या 30 दिवसांत ओला उबेरची सेवा मात्र सुरु असणार आहे. असे असले तरी, शहर व परिसरात सुमारे ५० हजार कॅब आहेत. त्यात ओला- आणि उबरचा वाटा ७५ ते ८० टक्के आहे. आणखी पाच कॅब कंपन्यांकडून शहरात प्रवासी वाहतूक सुरू आहे. मात्र, तरीही परवाना मिळण्यासाठी त्यांनी अद्याप ‘आरटीए’कडे अर्ज केलेला नाही.
(The above story first appeared on LatestLY on Mar 13, 2024 12:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

