Pune Crime News: वर्गात क्षुल्लक कारणांवरून भांडण झाल्याने 10 वीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण, कात्रज येथील चौघांवर गुन्हा दाखल
fight | pixabay.com

Pune Crime News: पुणे हे विद्येचे माहेर घर म्हटले जायचं परंतु आता गुन्हेगारी वाढत असल्यामुळे नागरिकांना संताप व्यक्त केला आहे. पुण्यातील कात्रज परिसरात एका 15 वर्षाच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचे धक्कादायक घटना समोर येत आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी 10 वीचा पेपर देऊन घरच्या दिशेने जात होता त्यावेळीस ही घटना घडली. रस्त्यात चार जणांनी पीडित विद्यार्थ्याला घेरलं आणि त्याला बेदम मारहाण केली.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर आणि पीडित विद्यार्थी हे दहावीत आहे.त्यांचे एकच सेंटर होते. पीडित आणि विद्यार्थ्यांमध्ये काही वाद झाला होता. त्याचा राग मनात धरात पीडितेवर हल्ला केला. परिक्षा सुटल्यानंतर पीडितेला रस्त्यावर अडवले आणि भर ऊनात रस्त्यावर पीडित विद्यार्थाला बेदम मारहाण केली. बेदम मारहाणीत पीडितेला गंभीर जखमा झाल्या आहेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हेही वाचा-  'परीक्षा सुरू आहे, स्पीकरचा आवाज कमी करा' सांगितलं, तरूणांनी त्याला धू धू धुतलं

पीडित मुलाच्या तक्रारीवरून पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवला गेला आहे. पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करून घेतला आहे. पीडिताने सांगितले की, दोन दिवसांपूर्वी आंबेगाव बुद्रुक स्मशानभुमी परिसातील पीएमपी बस  स्थानकावर आले होते. त्यावेळीस ते अन्य चार जण पीडिते जवळ आले आणि शीवीगाळ केले आणि निघून गेले. वर्गात कोणत्यातरी काराणावरून भांडण झाल्यामुळे त्यांनी पीडितेला बेदम मारहाण केले. या घटनेमुळे शाळेत एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांनी देखील संताप व्यक्त केला आहे.