Coronavirus | (Photo Credit: Archived, edited, representative images)

जगात कोरोना संकट थोडं नियंत्रणात येत असल्याचं चित्र असताना आता पुन्हा ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant) मुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सध्या या नव्या व्हेरिएंटचा भारतामध्ये एकही रूग्ण नाही पण त्याचा धोका दाखलही होऊ नये म्हणून सरकार आणि प्रशासन अलर्ट मोड वर येऊन काम करत आहे. आज जारी करण्यात आलेल्या नव्या गाईडलाईन्स नुसार आंतरराष्ट्रीय प्रवाशांसोबतच आता देशांतर्गत प्रवास करणार्‍यांसाठीही मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) कडक नियमावली तयार करण्यात आली आहे. आता मुंबई एअरपोर्ट वर उतरणार्‍या देशांतर्गत प्रवाशांनाही Negative RT-PCR Report बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच हा रिपोर्ट 72 तासांपेक्षा पूर्वीचा नसावा असे देखील निर्देश देण्यात आले आहेत. हे देखील वाचा: Omicron चा धोका पाहता भारतात 15 डिसेंबर पासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या निर्णयाला स्थगिती.

केंद्राकडूनही जारी करण्यात आलेल्या सूचनावलीमध्ये मुंबई साठी विशेष नियमांची योजना करण्यात आली आहे. सध्या सार्‍या देशांतर्गत एअरलाईन्सला त्यांच्या विमानातून मुंबई साठी प्रवास करणार्‍या कोणत्याही व्यक्तीला Negative RT-PCR Report असल्याशिवाय प्रवेश न देण्याचा आदेश दिला आहे. हे देखील वाचा: Revised Guidelines for International Travellers In India: भारतामध्ये Omicron Variant च्या पार्श्वभूमीवर 'At-Risk'देशातून येणार्‍यांना विमानतळावर COVID-19 Testing बंधनकारक .

महाराष्ट्रात 'अ‍ॅट रिस्क' असलेल्या देशांमधून 6 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आले आहे. त्यामध्ये मुंबई शहराचा देखील समावेश असल्याने आता अधिक खबरदारी घेतली जात आहे. अगदीच अपवादात्मक परिस्थितीमध्ये कोविड रिपोर्ट्स शिवाय विमानात प्रवेश दिला जाईल पण मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर मात्र टेस्ट करावी लागणार आहे. मुंबई विमानतळावर हे नवे नियम 2 डिसेंबरच्या रात्री 23.59 मिनिटांनी लागू केले जाणार आहेत.

सध्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना कोविड टेस्ट आणि क्वारंटाईन नियम बंधनकारक करण्यात आले आहेत. यामध्ये प्रवाशांना विमानतळावर आल्यानंतर 2, 4, 7 व्या दिवशी टेस्ट करावी लागणार आहे. यामध्ये टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास प्रशासनाच्या क्वारंटीन सेंटर मध्ये तर निगेटिव्ह रिपोर्ट आला तरीही होम क्वारंटीन केले जाणार आहे.

केंद्र सरकारने 26 नोव्हेंबर दिवशी चीन, न्यूझिलंड, साऊथ आफ्रिका,ब्राझील,बांग्लादेश,मॉरिशिएस,झिम्बॉम्बे, सिंगापूर, इस्राईल, हॉंगकॉंग, युके सह युरोपियन देश यांना 'At-Risk' देशांच्या यादीमध्ये टाकलं आहे