
नालासोपारा येथील कान्हा फार्म हाऊस येथे पोलिसांनी थेट धाड टाकत चोरीछुप्या मार्गाने चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांना या बाबत सूत्रांकडून माहिती मिळाल्याने पूर्वतयारीनिशी पोलिसांनी या फार्म हाऊसवरील वेश्याव्यवसाय उघडकीस आणला आहे.
या प्रकरणी अद्याप पोलिसांकडून जास्त माहिती देण्यात येत नाही आहे. तर वेशाव्यवसाय करणाऱ्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. (हेही वाचा-सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दलालास अटक; पालघर पोलिसांची कारवाई)
पालघर पोलिसांनी (Palghar Police) सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत एका दलालाही ताब्यात घेतले होते.पालघरमधील सातपाटी पोलीस ठाणे हद्दीत सेक्स रॅकेट (Sex Racket) चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली असता त्यात सत्यता आढळली. सातपाटी पोलीस ठाण्यात दलालाविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.