youth arrested for spitting-on roti at wedding ceremony

Viral Video: उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात एका लग्न समारंभात एक तरुण नान बनवतांना त्यावर थुंकताना दिसला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच या तरुणाविरोधात हिंदू संघटनांनी केलेल्या कारवाईच्या मागणीनंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत आरोपीला अटक केली. इम्रान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी शहर पोलिस अधीक्षक आयुष विक्रम सिंह यांनी माध्यमांना माहिती दिली की, इम्रान मेरठमधील मुंडाली पोलिस स्टेशन परिसरातील रहिवासी आहे. तो21 फेब्रुवारी रोजी ब्रह्मपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रेम मंडप येथील एका लग्न समारंभाला गेला होता. तेथे तो नान बनवत होता आणि या दरम्यान तो मध्ये ठेवण्यापूर्वी नानवर थुंकत होता. या कृत्यासाठी त्याला अटक करण्यात आली आहे.

येथे पाहा व्हायरल व्हिडीओ: 

यूपीच्या मेरठमध्ये याआधीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. उत्तर प्रदेशात पोळी किंवा नानवर थुंकण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. महिनाभरापूर्वी मेरठच्या हापुड रोडवर अशीच एक घटना घडली होती.