
Navi Mumbai: नवी मुंबईत सुरु असलेल्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी लावला असून या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. शुक्रवारी एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे, नवी मुंबई पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी पथकाने बुधवारी वाशी येथील एपीएमसी जवळील एका लॉजवर छापा टाकला, असे एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. बेकायदेशीर रित्या सुरु असलेल्या या वेश्याव्यवसायाची माहिती मिळाल्यानंतर पुष्टी करण्यासाठी बनावट ग्राहक पाठवल्यानंतर हा छापा टाकण्यात आला. छाप्यादरम्यान, पोलिसांनी वेश्याव्यवसायात भाग पाडल्या जाणाऱ्या तीन महिलांची सुटका केली, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. त्यांना सरकारी बचाव आणि पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आले आहे, जिथे त्यांना समुपदेशन आणि मदत दिली जाईल, असे त्यात म्हटले आहे.
पोलिसांनी लॉज मॅनेजर बंटी सॉ, कुक कुमार गौडा आणि एजंट तारापदा दास यांना अटक केली आहे. या टोळीत सहभागी असल्याचा संशय असलेल्या विकी नावाच्या चौथ्या व्यक्तीला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.