Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज 1,174 कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 93,894 वर
Coronavirus (Photo Credits: PTI)

महाराष्ट्राची राजधानी मुंबई (Mumbai) मध्ये आज कोरोना विषाणूचे (Coronavirus) 1,174 रुग्ण आढळले आहेत व 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे मुंबईमधील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 93,894 वर पोहोचली आहे व मृतांचा आकडा 5,332 झाला आहे. आज शहरात 750 कोरोना व्हायरस रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण 65,622 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईमध्ये सध्या 22,939 सक्रीय रुग्ण आहेत. आज मुंबईमध्ये 934 कोरोन संशयित रुग्णांची भरती करण्यात आली आहे. बीएमसीने (BMC) याबाबत माहिती दिली आहे.

आजचे नमूद केलेले सर्व 47 मृत्यू गेल्या 48 तासांत झाले आहेत. यातील 37 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 31 रुग्ण पुरुष व 16 रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 6 जणांचे वय 40 वर्षा खाली होते, 28 जणांचे वय 60 वर्षा वर होते, तर उर्वरित 13 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 70 टक्के आहे. 5 जुलै ते 12 जुलै पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 1.36 टक्के होता. शहरात 12 जुलै 2020 पर्यंत झालेल्या कोविड च्या एकूण चाचण्या 3, 96, 500 इतक्या आहेत. मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा दर 51 दिवस आहे. (हेही वाचा: मुंबईतील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात, 100 टक्के लॉकडाऊनची गरज नाही; महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची माहिती

)

पुढे बीएमसीने शहरातील सुविधा केंद्रांबाबत माहिती दिली आहे. DCH & DCHC-जास्त लक्षणे व गंभीर रुग्णांसाठी + मध्यम लक्षणे व दिर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांसाठी खतांची संख्या 16,859 आहे. सक्रिय CCC2- लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी बेड्सची संख्या 5962/23810 आहे. शहरात ICU Beds/Ventilator Beds 1738/1054 आहेत व Oxygen Bed 11250 आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात आज, दिवसभरात 6,497 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, याशिवाय 4,182 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून 193 मृत्यूंची नोंद झाली आहे. यानुसार राज्यात आज एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2,60,924 इतकी झाली आहे.