MNS कडून लालबाग परिसरात पोस्टरबाजी; 'राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल'
MNS Poster| Twitter/ANI

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा येत्या 5 जूनला अयोद्धा दौरा नियोजित आहे. परंतू मनसे आणि राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी मगच त्यांना उत्तर प्रदेशच्या भूमीत पाय ठेवायला देणार अशी भूमिका भाजपा खासदार बृजभूषण सिंग यांनी घेतली आहे. दरम्यान अशा तणावग्रस्त स्थितीत मनसे (MNS) आणि राज ठाकरेंचा अयोद्धा दौरा कसा होणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे भोंगा उतरवण्याच्या मनसेच्या भूमिकेवरून त्यांच्यावर राज्यभरात विविध  ठिकाणी केसेस टाकण्यात आल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी भोंग्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी आली होती. त्यावरून अधिक सुरक्षेची मागणी करूनही केवळ 2 रक्षक वाढवल्याने ही मस्करी केल्याचं म्हणत मनसेने राज्य सरकारच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला होता. आता लालबाग मध्ये मनसे कडून पोस्टर लावण्यात आलं आहे. ज्या मध्ये 'राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल' असा थेट इशारा देण्यात आला आहे. शिवडी विधानसभा क्षेत्रात हे पोस्टर सध्या सार्‍यांचं लक्ष वेधून घेत आहे. नक्की वाचा:  Raj Thackeray Ayodhya Visit: भाजपामध्ये दोन प्रवाह, एकीकडे MP Brij Bhushan Sharan Singh चा विरोध असताना MP Lallu Singh स्वागताला सज्ज.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नुकतेच पुणे दौरा अर्धवट सोडून काल प्रकृती अस्वास्थ्यामुळे परतले आहेत. त्यांची पुण्यात सभा नियोजित होती पण आता अयोद्धा दौर्‍यापूर्वी ही सभा होणार का? हा प्रश्न मनसैनिकांना पडला आहे. MNS: मुस्लिम संघटनांकडून धमक्या? बाळा नांदगावकर यांच्याकडून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट, पत्रही दिले .

बृजभूषण सिंह यांनी माफी मागा आणि मग या ही आपली भूमिका ठाम ठेवली असली तरीही मनसे कडून अद्याप त्यावर प्रतिक्रिया देण्यात आली नाही. मात्र अयोद्धा दौर्‍याला जाण्यासाठी त्यांनी 11 ट्रेन्स बूक केल्याचीही माहिती काही दिवसांपूर्वी देण्यात आली आहे.