Dharavi (Photo Credits: Wikimedia Commons)

महाराष्ट्रातील मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक आहे. त्यामुळे येत्या 10 ते 17 मे पर्यंत लॉकडाउनच्या नियमाचे अधिक कठोरपणे पालन केले जाणार आहे. याच दरम्यान, धारावीत आज आखणी कोरोनाचे 25 रुग्ण आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. त्यामुळे धारावी परिसरातील आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 833 वर पोहचला असून 27 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत 222 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आल्याचे ही सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. तर राज्यात कोरोनाचा वेग संथ करण्यास यश आले असले तरीही त्याची साखळी अद्याप तुटलेली नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

धारावी परिसरात दाटीवाटीने लोक राहत असून तेथे सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करणे शक्य नाही आहे. तरीही पोलिसांच्या या ठिकाणी 24 तास पहारा असून तेथील नागरिकांना दिवसभराचे अन्न घरोघरी जाऊन पोहचवले जात आहेत. धारावी परिसर हा कंन्टेंटमेंट झोनमध्ये असून तेथे कोणत्याही कामांना परवानगी नाही आहे. तर आज मुंबईचे नवे महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी धारावी परिसात भेट देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.(मुंबईतील समता नगर पोलीस स्थानकात स्थलांतरित कामगारांनी घरी परत जाण्यासाठी अर्ज दाखल करण्यासाठी लावल्या रांगा)

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 19 हजारांच्या पार गेला आहे. तर राज्याची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन नुसार विभागणी करण्यात आली आहे. विविध राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून लॉकडाउनचे नियम शिथील करण्यात आले आहे. त्याचसोबत नागरिकांनी लॉकडाउनचे नियम काटेकोरपणे पाळावेत अशी अपेक्षा केली जात आहे.