
कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. या काळात महाराष्ट्रातील जवळजवळ 96 टक्के लोकांच्या उत्पन्नात घट झाल्याचे समोर आले आहे. राज्यात अन्न अधिकार अभियानाअंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही बाब उघडकीस आली आहे. याबद्दलच्या समन्वक मुक्ता श्रीवास्तव यांनी असे म्हटले की, सामान्य व्यक्तीच्या उत्पन्नात घट होण्यामागील मुख्य कारण म्हणजे नोकरी जाणे आणि त्याची नोकरी नसणे.(COVID19 in Mumbai: मुंबईत लोकलमुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ? पहा BMC ची आकडेवारी)
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या प्रत्येक पाचव्या व्यक्तीकडे जेवण खरेदी करण्याचे सुद्धा पैसे नसल्याने त्यांना उपाशी राहण्यास भाग पाडले गेले आहे. या अभियानाअंतर्गत खाद्य आणि पोषण क्षेत्राच्या कार्यकर्त्यांच्या समूहाने गेल्या वर्षात मे आणि सप्टेंबर महिन्यात मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नंदुरबार, सोलापूर, पालघर,नाशिक, धुळे आणि जळगाव येथे एकूण 250 जणांवर हे सर्वेक्षण करण्यात आले.
केंद्राने देशात कोविड19 च्या कारणामुळे गेल्या वर्षात मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यानंतर हळूहळू लॉकडाऊन उठवला जात काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली गेली. तर श्रीवास्तव यांनी असे म्हटले की, यामध्ये 96 टक्के लोकांच्या उत्पन्नात घट झाली आहे. ही स्थिती लॉकडाऊन उठवल्यानंतर पाच महिने सुद्धा दिसून आली आहे. यामधील 52 टक्के लोक हे ग्रामीण विभागातील आहेत. तर यामध्ये 60 टक्के महिलांचा समावेश आहे.
श्रीवास्तव यांनी पुढे असे ही म्हटले की, लॉकडाऊनपूर्वी जवळजवळ 70 टक्के लोकांचे मासिक पगार सात हजार रुपये होता. तर उर्वरित लोकांना तीन हजार रुपये वेतन दिले जात होते. अशातच ऐवढा कमी पगारात सु्द्धा कपात झाल्याने कोरोनाचा अत्यंत वाईट परिणाम झाल्याचे दिसून येते. त्याचसोबत जवजवळ 49 टक्के लोकांना जेवण खरेदी करण्यासाठी आपल्या मित्रांसह नातेवाईकांकडून उधारीवर पैसे घ्यावे लागले आहेत.(Coronavirus in Pune: कोविड-19 रुग्णांची वाढती संख्या पाहता पुण्यात येत्या 8 दिवसांत 'हे' निर्बंध लागू होण्याची शक्यता)
तसेच या लोकांचे पगार लॉकडाऊन नंतर सुद्धा मे आणि एप्रिल महिन्यात त्यांचा पगार आला नसल्याचे मुक्ता श्रीवास्तव यांनी सांगितले आहे. फक्त 10 टक्के लोक असे होते की त्यांचा पगार लॉकडाऊनपूर्वीच्या स्तरावर जाऊन पोहचला आहे. त्याचसोबत अन्नधान्य खरेदी करण्यासाठी 12 टक्के लोकांनी आपले दागिने आणि तीन टक्के लोकांनी आपल्या जमिनी विकल्या आहेत.