COVID19 in Mumbai: मुंबईत लोकलमुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ? पहा BMC ची आकडेवारी
Local train service resumes for all in Mumbai (Photo Credits-ANI)

COVID19 in Mumbai: मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. तर राज्य सरकार वाढत्या कोरोनाच्या रुग्णांमुळे कठोर पावले उचलत आहे. उद्धव ठाकरे यांच्या सरकारने शहरात संचारबंदी आणि लॉकडाऊनची घोषणा सुद्धा केली आहे. महापालिकेला सुद्धा कठोर निर्देशन दिले गेले आहेत. सरकारने मुंबईकरांना कोरोनाच्या परिस्थितीचे भान ठेवता वागलात तर लॉकडाऊनची गरज भासेल असा इशारा दिला आहे.(Aurangabad: औरंगाबादच्या कोव्हिड सेंटरमध्ये घडला धक्कादायक प्रकार; कोरोनाबाधित रुग्ण चक्क गेट उघडून पडले बाहेर, पाहा व्हिडिओ)

याच दरम्यान बहुतांश लोकांनी असे म्हटले आहे की, मुंबईत कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचे कारण लोकल आहे. पण रेल्वे सुविधेसंबंधित अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, कोविड19 च्या संपूर्ण नियमांचे पालन केले जात आहे. तर महापालिकेने सुद्धा जी आकडेवारी जाहीर केली आहे त्यांना सुद्धा लोकल मुळे रुग्णांमध्ये भर पडत असल्याचे वाटत आहे. मुंबईत सर्वसामान्यांसाठी ही लोकल गेल्या 1 फेब्रुवारी पासून सुरु करण्यात आली.

Tweet:

या प्रकरणी महापालिकेच्या आयुक्तांचे असे म्हणणे आहे की, जर लोकलमुळे कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असल्यास ते समजण्यास तीन आठवडे लागतील. आम्ही 1 फेब्रुवारी पासून तीन आठवडे दूर आहोत. तर लोकलमध्ये होणारी गर्दी यामुळे काही प्रमाणात रुग्णांमध्ये वाढ झाली असावी. तर मुंबईत गेल्या काही दिवसांपासून 1 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत.(Coronavirus in Pune: कोविड-19 रुग्णांची वाढती संख्या पाहता पुण्यात येत्या 8 दिवसांत 'हे' निर्बंध लागू होण्याची शक्यता)

दरम्यान, गेल्या मार्च महिन्यात कोरोना व्हायरसमुळे लोकल बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता 1 फेब्रुवारी पासून सामान्य नागरिकांसाठी सुरु केली गेली. पण त्यानंतर आता कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. पण मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून कोरोनाच्या नियमांचे सर्वोतोपरी पालन केले जात आहे. मात्र गर्दीमुळे काही प्रमाणात रुग्णांमध्ये वाढ होत आहे.