SSC HSC Result | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) इयत्ता बारावीची परीक्षा (विज्ञान, वाणिज्य, कला) निकालाची प्रतिक्षा आहे. शिक्षणमंत्री दादा भूसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या वर्षी (2025) हा निकाल (HSC Result Date) 15 मे पूर्वी जाहीर केला जाणार आहे. राज्याच्या शिक्षण विभागाकडून तसे प्रयत्न सुरु आहेत. असे असले तरी, अद्यापपर्यंत कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाही. दरम्यान, लवकरच ती जाहीर होईल. या पार्श्वभूमीवर हा निकाल कमी वेळेत आणि अत्यंत तत्काळ हा निकाल आपण ऑनलाईन पाहू शकता. त्यासाठी अधिकृत वेबसाइट्स - mahresult.nic.in, hscresult.mahahsscboard.in आणि hscresult.mkcl.org वर विद्यार्थी हे गुणपत्रक कसे पाहू शकतात, याविषयी घ्या जाणून.

निकाल तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा द्वारे इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा विज्ञान, वाणिज्य, कला या तिन्ही शाखांची असते. ज्याचे निकाल एकाच दिवशी जाहीर होतात. हे निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी काही अधिकृत वेबसाईट्स दिल्या जातात. या वेबसाईट्स खालील प्रमाणे:

  1. mahresult.nic.in
  2. hscresult.mkcl.org
  3. hscresult.mahahsscboard.in
  4. results.digilocker.gov.in

महाराष्ट्र बारावीचा निकाल ऑनलाइन कसा तपासायचा?

दरम्यान, निकाल कोठे पाहायचा? यासाठी वेबसाईट तर माहिती झाल्या. पण, त्यावर निकाल पाहायचा कसा? याबाबत घ्या जाणून. (हेही वाचा, Maharashtra SSC & HSC Results 2025 Dates: महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीच्या निकालाची प्रतीक्षा; जाणून घ्या संभाव्य तारखा)

  • अधिकृत निकाल वेबसाइटला भेट द्या: mahresult.nic.in
  • महाराष्ट्र बारावीचा निकाल 2025 लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा रोल नंबर, सीट नंबर आणि आईचे नाव एंटर करा.
  • तुमचा निकाल पाहण्यासाठी सबमिट वर क्लिक करा. तुमची ई-मार्कशीट स्क्रीनवर दिसू लागेल.
  • भविष्यातील संदर्भासाठी तुमची ई-मार्कशीट डाउनलोड करा आणि प्रिंट करा.

(टीप: वरील प्रक्रिया निकाल जाहीर झाल्यानंतर करायची आहे. अद्याप निकालाची तारीखही जाहीर नाही. त्यामुळे सध्यास्थितीत वरील प्रक्रीया कराल तर तुम्हाला ई-मार्कशीट दिसणार नाही. त्यामुळे निकालाची तारीख जाहीर होऊन, निकाल येईपर्यंत प्रतिक्षा करा.)

दरम्यान, महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल अजून जाहीर झाला नाही. निकाल जाहीर केला जाण्याच्या तारखेबाबत अजूनही प्रतिक्षा आहे. लवकरच तारीख जाहीर होईल. त्यानंतर निकालाच्या दिवशी निश्चित वेळेनंतर विद्यार्थ्यांनी त्यांचे निकाल ऑनलाइन तपासावेत आणि ई-मार्कशीट डाउनलोड करावी. पुनर्मूल्यांकन किंवा पुरवणी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांनी बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावेत. नवीन आणि अद्ययावत माहितीसाठी अधिकृत MSBSHSE वेबसाइटवरील माहिती जाणून घ्या.