Exam Result | (File Image)

विद्यार्थ्यांसाठी दहावी आणि बारावी हा त्यांच्या जीवनातील टर्निंग समजला जातो. यानंतरच त्यांच्या करियरला एक नवी दिशा प्राप्त होते. आता महाराष्ट्रातील विद्यार्थी त्यांच्या यंदाच्या दहावी आणि बारावीच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) दरवर्षी 10 वी (SSC) आणि 12 वी (HSC) च्या परीक्षा घेते. 2025 या शैक्षणिक वर्षासाठी, 10 वीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत पार पडल्या, तर 12 वीच्या परीक्षा 11 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत झाल्या. या परीक्षांचे निकाल कधी जाहीर होतील, याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता आहे. मंडळाने अजूनतरी निकालाची तरीइख अधिकृतरीत्या जाहीर केलेली नाही, मात्र मागील वर्षांच्या अनुभवावरून आणि उपलब्ध माहितीच्या आधारे, या निकालांच्या तारखांबद्दल अंदाज बांधता येतो.

अहवालानुसार, 10 वीचा निकाल हा साधारणपणे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. म्हणजेच, 25 ते 27 मे 2025 या दरम्यान हा निकाल घोषित होऊ शकतो. दुसरीकडे, 12 वीचा निकाल हा मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात, म्हणजे 10 ते 20 मे 2025 च्या आसपास येण्याची अपेक्षा आहे. हे दोन्ही निकाल महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर, म्हणजेच mahresult.nic.in वर उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि आईचे पहिले नाव वापरून निकाल पाहता येईल. मात्र, या तारखा केवळ अंदाजावर आधारित आहेत आणि बोर्डाकडून अधिकृत घोषणा झाल्यावरच त्याची खात्री होईल.

या परीक्षा संपल्यानंतर बोर्डाला निकाल तयार करण्यासाठी सुमारे दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लागतो. मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निकाल जाहीर करण्याची तारीख बोर्ड एका पत्रकार परिषदेद्वारे सांगते. मागील वर्षी, 2024 मध्ये 10 वीचा निकाल 27 मे रोजी आणि 12 वीचा निकाल 21 मे रोजी जाहीर झाला होता. त्यामुळे यंदाही असाच कालावधी अपेक्षित आहे. निकालाच्या दिवशी संकेतस्थळावर गर्दी होऊ शकते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी संयम ठेवून प्रयत्न करावा. तसेच, निकालाची प्रत डाउनलोड करून ठेवणे आणि मूळ गुणपत्रिका शाळेतून घेणे महत्त्वाचे आहे. (हेही वाचा: Maharashtra School New Timings: वाढत्या उष्णतेमुळे सरकारचा मोठा निर्णय; राज्यातील शाळांच्या वेळा बदलल्या, जाणून घ्या आता कोणत्या वेळेत भरणार वर्ग)

महाराष्ट्र बोर्डाने यंदा परीक्षा लवकर घेण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून निकालही लवकर जाहीर होऊन विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी पुरेसा वेळ मिळेल. 10 वी आणि 12 वीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाचा मार्ग निवडावा लागतो. 10 वी नंतर विज्ञान, वाणिज्य किंवा कला शाखा निवडता येते, तर 12 वी नंतर उच्च शिक्षण किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांचा पर्याय उपलब्ध होतो. ज्या विद्यार्थ्यांना निकालात समाधान वाटणार नाही, त्यांच्यासाठी पुरवणी परीक्षा (Supplementary Exams) जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात घेतल्या जातील. या संधीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही.