
महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) द्वारे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी परीक्षेच्या निकालाची (Maharashtra HSC Result 2025) ची आतुरतेने वाट पाहत आहेत. या काळात सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे, निकाल नेमका कधी जाहीर होणार? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आम्ही मागील 5 वर्षांतील महाराष्ट्र HSC (12वी) निकालाच्या तारखा एकत्रित केल्या आहेत, ज्या एमएसबीएसएचएसई (MSBSHSE) मार्फत अधिकृतपणे घोषित करण्यात आल्या होत्या. या तारखांचा कालावधी पाहता यंदाच्या वर्षी इयत्ता बारावीचा निकाल केव्हा लागेल याबाबत काही आखाडे बांधता येऊ शकतात.
पाठिमागील पाच वर्षांममध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल केव्हा लागला, याच्या तारखा खालीलप्रमाणे:
महाराष्ट्र HSC निकाल - मागील 5 वर्षांचा डेटा
2024: May 21, 2024 (मंगळवार)
2023: May 25, 2023 (गुरुवार)
2022: June 8, 2022 (बुधवार)
2021: August 3, 2021 (मंगळवार) – (COVID-19 मुळे अंतर्गत मूल्यांकनावर आधारित निकाल)
2020: July 16, 2020 (गुरुवार) – (कोरोनामुळे उशीराने निकाल)
2025 मध्ये निकाल कधी लागू शकतो?
पाठिमागील दोन वर्षांमध्ये म्हणजेच 2023 आणि 2024 च्या ट्रेंडनुसार, जेव्हा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर झाला होता, त्यानुसार Maharashtra HSC Result 2025 देखील मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील अधिकृत घोषणा MSBSHSE मार्फत त्यांच्या संकेतस्थळावर mahresult.nic.in आणि अधिकृत सोशल मीडियावर केली जाईल. (हेही वाचा, महाराष्ट्रात CBSE पॅटर्न लागू झाल्यावर Maharashtra SSC,HSC Board बंद होणार? जाणून घ्या शिक्षण पद्धतीमधील हा नेमका बदल कशात)
विद्यार्थ्यांनी काय करावे?
अधिकृत संकेतस्थळ आणि विश्वासार्ह शैक्षणिक पोर्टल्सवर लक्ष ठेवा
आपला रोल नंबर आणि आईचे नाव तयार ठेवा (निकाल पाहताना आवश्यक असते)
सोशल मीडियावरील अफवा आणि खोट्या लिंकपासून सावध रहा. (हेही वाचा, Maharashtra HSC Pass Percentage: महाराष्ट्र बोर्ड बारावी परीक्षा पाच वर्षांतील उत्तीर्णांची टक्केवरी, 2025 चा निकाल कधी? घ्या जाणून)
महाराष्ट्र HSC परीक्षा विषयी थोडक्यात
महाराष्ट्र राज्य मंडळाच्या 12वीच्या परीक्षा (HSC) या विज्ञान, कला, वाणिज्य शाखांसाठी घेतल्या जातात. या परीक्षेचा निकाल महत्त्वाचा असतो कारण त्यावरून महाविद्यालयातील प्रवेश, स्पर्धा परीक्षांमध्ये पात्रता इत्यादी गोष्टी ठरतात.
दरम्यान, HSC Result 2025 ची अधिकृत तारीख अद्याप घोषित झालेली नाही, परंतु मागील वर्षांच्या ट्रेंडनुसार मे महिन्याच्या शेवटी निकाल लागण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी संयम बाळगावा, सतत अधिकृत माहिती तपासत रहावी आणि कोणत्याही गैरसमजांपासून, दिशाभूल करणाऱ्या कोणत्याही संदेशांपासून दूर राहावे. वाचकांच्या माहितीसाठी असे की, एमएसबीएसएचएसई बोर्डाकडून इयत्ता बारावी परीक्षा निकाल 2025 बाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.