English Medium School | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्र सरकार कडून आता राज्यात शिक्षण पद्धतीमध्ये सुधार करण्यासाठी सीबीएससी पॅटर्न राबवण्याचा विचार आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सीबीएससी चा अभ्यासक्रम ( CBSE Curriculum) राबवला जाणार आहे.राज्य अभ्यासक्रम आराखड्याला शालेय शिक्षण विभागाशी संदर्भात सुकाणू समितीने मान्यता दिली आहे. मग सरकारच्या या निर्णयानंतर SSC,HSC Board बंद होणार? का असा प्रश्न शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना पडला आहे. जाणून घ्या नेमकं महाराष्ट्रात स्टेट बोर्डचं काय होणार?

महाराष्ट्रात SSC, HSC Board बंद होणार?

महाराष्ट्रात CBSE पॅटर्न लागू करणार असल्याची घोषणा झाल्यानंतर स्टेट बोर्डचं काय होणार? हा प्रश्न अनेकांच्या मनात आला पण शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी त्यावर स्पष्टीकरण देताना राज्यात सीबीएससी चा अभ्यासक्रम जरी सरकारी शाळेत लागू होत असला तरीही स्टेट बोर्ड कायम राहणार असल्याचं स्पष्टपणे सांगितले आहे. राज्यात अभ्यासक्रमातील बदलांनंतरही परीक्षा या स्टेट बोर्डाकडूनच घेतल्या जाणार असल्याने राज्यात SSC, HSC बोर्ड बंद होणार असल्याची चर्चा खोटी आहे. तशी माहिती सोशल मीडीयातून तुमच्यापर्यंत आली असल्यास ते खोटं आहे.

महाराष्ट्रात शिक्षण पद्धती मध्ये बदल का होत आहे?

महाराष्ट्रामध्ये शिक्षण बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये बदल होणार आहे. हा बदल करताना महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ एनसीईआरटीचा अभ्यासक्रम घेणार आहेत. पण भाषा, इतिहास, भूगोल याचा अभ्यासक्रम राज्य शिक्षण मंडळ ठरवणार आहे. एकूण अभ्यासक्रमामध्ये 70% सीबीएसई आणि 30% स्टेट बोर्डाचा अभ्यास असणार आहे. नक्की वाचा: महाराष्ट्रात 2025-26 पासून सुरू होणारा सरकारी शाळांमधील CBSE पॅटर्न कसा असणार? जाणून घ्या बोर्ड निवडता येणार का? ते SSC Board बंद होणार का? 

राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमामध्ये सीबीएससीचा अभ्यासक्रम राबवण्यामागे विदयार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे ही इच्छा तर या अभ्यासक्रमाचा फायदा JEE, NEET, UPSC यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांसाठी होणार आहे.  स्टेट बोर्डाच्या विद्यार्थ्यांची त्या परीक्षांसाठीही तयारी शालेय स्तरांतून सुरू करता येणार आहे.