
महाराष्ट्रामध्ये आता 2025-2026 पासून सरकारी शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधिमंडळात निवेदन सादर करत त्याची माहिती दिली आहे. त्यामुळे अचानक शिक्षण पद्धतीमध्ये झालेला बदल मुलांच्या शिक्षणावर कसा बदल होणार? हा प्रश्न पडला आहे. दरम्यान पालक आणि विद्यार्थ्यांना असलेल्या काही प्रश्नांची इथे जाणून घ्या उत्तरं काय? दरम्यान राज्य अभ्यासक्रम आराखड्याला शालेय शिक्षण विभागाशी संदर्भात सुकाणू समितीने मान्यता दिली असल्याची माहिती दादा भुसेंनी दिली आहे.
CBSE पॅटर्न कधी लागू होणार?
CBSE पॅटर्न हा राज्यात एकाच वेळी सार्या इयत्तांना लागू होणार नाही. 2025-26 ला पहिली साठी सीबीएसई पॅटर्न लागू होणार आहे. 2026-27 मध्ये इयत्ता दुसरी ते चौथी आणि सहावी साठी लागू होणार आहे. 2027-2028 ला इयत्ता पाचवी, सातवी, नववी आणि अकरावी आणि 2028-29 ला इयत्ता आठवी, दहावी आणि बारावी ला लागू होणार आहे.
CBSE पॅटर्न लागू झाल्यावर Maharashtra SSC Board बंद होणार?
CBSE पॅटर्न लागू झाला तरीही राज्य शिक्षण मंडळ बंद होणार नाही. सध्या जशी दहावी,बारावी ची बोर्ड परीक्षा राज्य मंडळ घेणार आहे. सीबीएसई पॅटर्नवर आधारित अभ्यासक्रम राज्यात राबवला जाणार आहे. CBSE Curriculum In State Schools: राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम स्वीकारण्यास विरोध; सुप्रिया सुळे यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना पत्र .
पालकांना बोर्ड निवडता येणार का?
CBSE पॅटर्न लागू झाला तरीही राज्य शिक्षण मंडळ बंद होणार नाही. बोर्ड किंवा कोणत्या शाळेत प्रवेश घ्यायचा हे बंधन नाही.
शाळेचं वेळापत्रक कसं असेल?
भौगोलिक परिस्थितीनुसार व हवामानानुसार शाळेचं वेळापत्रक ठरवता येणार आहे.
अभ्यासक्रम कसा असणार?
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात 70 टक्के आणि 30 टक्के फॉर्म्युला असणार आहे. 70% सीबीएसई आणि 30% स्टेट बोर्डाचा अभ्यास असणार आहे. भाषा आणि इतिहास,भूगोल या विषयांचा अभ्यासक्रम राज्य शिक्षण मंडळ ठरवणार आहे. आता येणार्या पहिली इयत्तेमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम असणार आहे. त्यानंतर दरवर्षी एक एक इयत्तेचा अभ्यासक्रम बदलला जाणार आहे.
CBSE पॅटर्नमुळे विदयार्थ्यांना चांगले शिक्षण मिळणार आहे. त्याचा फायदा JEE, NEET, UPSC यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांसाठी होणार आहे.