महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणूकीपूर्वी काँग्रेस (Congress) पक्षात वाद सुरु असल्याचे दिसून आले आहे. तर हरियाणा मधील काँग्रेसचे माजी अध्यक्ष अशोक तन्वर (Ashok Tanwar) यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच मुंबईतील काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी तर पक्षाच्या नेतृत्वासंबंधित प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र यावर आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी उत्तर दिले आहे.
अशोक चव्हाण यांनी असे म्हटले आहे की, पक्षात गटबाजी सुरु असल्याचा आरोप निरुपम यांनी लावला आहे. तसेच पक्षात होते तो पर्यंत निरुपम यांनी गोड बोलणे केले. परंतु आता पक्षाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करुन त्यांच्यावर टीका करत आहेत. मात्र अशोक चव्हाण यांनी निरुमप हे माझे चांगले मित्र सुद्धा आहेत. त्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही.तर निरुपम यांनी काँग्रेस पक्ष प्रमुख सोनिया गांधी यांच्या पक्षाची साथ त्यांच्याजवळील नेतेमंडळींनी सोडावी. परंतु मी सोनिया गांधी यांच्या विरोधात नसून पक्षात सुरु असलेल्या लोकांपासून दुर राहण्याचा प्रयत्न करत आहे.
मात्र संजय निरुपम यांना पक्षाने डावलवून विधानसभा निवडणूकीसाठी तिकिट कापले आहे. पण ज्योतिरादित्य सिंधिया हे एकदा सुद्धा महाराष्ट्र दौऱ्यावर आले नसले तरीही त्यांना तिकिट देण्यात आले आहे. तसेच पक्षाने विधानसभा निवडणूकीसाठी सुद्धा डाववले असल्याचे निरुपम यांनी म्हटले आहे. एवढेच नाही मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासारखी माणसे असल्यामुळे पक्षात कोणताही रस उरलेला नाही.(महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी तिकिट कापल्यास काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची संजय निरुपम यांच्याकडून धमकी)
विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना तिकिट देण्यात आले आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांनी विधानसभेसाठी अनुक्रमे 125-125 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय घेतला आहे. त्याचसोबत अन्य 38 जागा मित्रपक्षांसाठी सोडणार आहे.