Chhatrapati Sambhaji Maharaj

Chhatrapati Sambhaji Maharaj Marathi Quotes: छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) हे त्यांच्या शौर्य, लष्करी पराक्रम आणि मुघलांविरुद्ध मराठा साम्राज्याचे रक्षण करण्यासाठी प्रसिद्ध होते. संभाजी महाराजांचा जन्म 14 मे इ.स. 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. संभाजी महाराजांना जिजाऊंनी लहानपणापासूनचं राजकीय धडे गिरवले होते. शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याचा डोलारा पुढे संभाजी मराहाजांनी यशस्वीरित्या पेलला.

संभाजी महाराजांनी अनेक लढाय्या जिंकल्या. परंतु, स्वराज्यातील काही लोकांना कटकारस्थानामुळे शंभूराजे मुघलांच्या जाळ्यात अडकले. त्यानंतर मुघल प्रशासक औरंगजेबाने संभाजी राजांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केली. औरंगजेबाने त्यांना धर्मांतर करण्यास सांगितले, पंरतु, शंभूराजांनी आपल्या जीवाची परवा न करता धर्मासाठी आपले बलिदान दिले. त्यांचे हे बलिदान आजही सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. 11 मार्च हा दिवस बलिदान दिवस (Balidan Diwas) म्हणून पाळला जातो. बलिदान दिनानिमित्त तुम्ही संभाजी महाराजांचे काही खास प्रेरणादायी विचार आपल्या मित्र-मैत्रिणींशी शेअर करू शकता. (Chhatrapati Sambhaji Maharaj Death Anniversary: छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी कधी आहे? शंभूराजांविषयी 'या' रोचक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?)

छत्रपती संभाजी महाराज प्रेरणादायी विचार -

  • शंभूराजे हुशार आणि चाणक्ष्य होते, त्यांना संस्कृतसह अनेक भाषांचे ज्ञान अवगत होते.
  • कतृत्व एवढं महान असावं, नुसता साज बघून स्वाभिमान जागा व्हावा.
  • भाग्याच्या भरवशावर नाही तर, तलवारीच्या भरवशावर आम्ही भविष्य निर्माण करतो.
  • शुन्यातून स्वराज्य निर्माण करणे सहज शक्य तर नव्हतच, पण त्याहून कठीण होत ते निर्माण केलेलं स्वराज्य टिकवणं
  • ज्यांचं मस्तक फक्त मातृभूमीसाठी झुकतं, त्यांना कुठंच मस्तक झुकवावे लागत नाही.
  • सिंहाची चाल, गरूडाची नजर, स्त्रीयांचा आदर, शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्याचे वर्तन, हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण
  • इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा संभाजी छत्रपती
  • मृत्यूचे आव्हान पेलुनी, तोच वारसा आम्हा दिला, शिवरायांचा शंभू छावा, हिंदू म्हणूनी अमर झाला
  • जे शंभाजी हे असं नाव आहे जे ऐकल्यावर अंगात शंभर हत्तीची शक्ती येते.
  • संघर्षातल्या दुनियेतले कधीही न आटणारे महासागर छत्रपती शिवशंभू
  • वाघाचा बछडा वाघासारखाच जगतो आणि वाघासारखाच मारतो. तो वाघ म्हणजे छत्रपती शंभाजी महाराज

महाराष्ट्रातील अनेक शिवभक्त बलिदान मास पाळतात. औरंगजेबाने संभाजी महाराजांचा तब्बल 40 दिवस छळ केला. त्यांना कठोर वेदना दिल्या. त्यामुळे संभाजी महाराजांच्या मृत्यूच्या 40 दिवस आधी बलिदान मास पाळण्यात येतो.