
National Testing Agency कडून Joint Entrance Examination (JEE) 2025 exam चं वेळापत्रक जारी केलं आहे. JEE Main 2025 session 2 exam याला सामोरे जाणारे विद्यार्थी हे वेळापत्रक डाऊनलोड करू शकतात. jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईट वर विद्यार्थ्यांना परीक्षांच्या तारखेची माहिती मिळणार आहे. परीक्षेच्या वेळापत्रकानुसार, JEE Main 2025 session 2 exam या 2 एप्रिल ते 9 एप्रिल दरम्यान होणार आहेत. यापूर्वी JEE Main 2025 session 2 exam या 1 ते 8 एप्रिल दरम्यान अअयोजित करण्यात आला होत्या. दरम्यान ही परीक्षा भारतात विविध ठिकाणी आणि सोबतच परदेशातही 15 ठिकाणी घेतली जाणार आहे.
JEE Main session 2 परीक्षा तारखा
एनटीए कडून JEE Main session 2 paper 1 हा 2,3,4आणि 7 एप्रिल दिवशी आयोजित केला आहे. ही परीक्षा दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये सकाळची शिफ्ट 9 ते 12 आणि दुसरी शिफ्ट 3 ते 6 असणार आहे.
8 एप्रिल दिवशी परीक्षा दुसर्या सत्रात म्हणजे 3 ते 6 या वेळेत घेतली जाईल. 9 एप्रिल दिवशी पेपर 2 हा केवळ सकाळच्या सत्रामध्ये होणार आहे.
कधी होणार अॅडमीट कार्ड्स रीलिज
JEE Main Session 2 परीक्षेची अॅडमीट कार्ड्स अर्थात हॉल तिकीट्स ही परीक्षेच्या तीन दिवस आधी मिळू शकतात. त्यामुळे अंदाजे अॅडमीट कार्ड्स रीलीज होण्याची तारीख 29 मार्च आहे. पण अॅडमीट कार्ड्स पूर्वी city intimation slip मिळणार आहे. CUET UG 2025 Registration Process Begins: NTA CUET परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन cuet.nta.nic.in वर सुरू; पहा महत्त्वाचे अपडेट्स .
NTA कडून JEE Main Session 2 exam चं रजिस्ट्रेशन 25 फेब्रुवारीला बंद करण्यात आले आहे.तर करेक्शन विंडो 27 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी खुली करण्यात आली होती.