Holi 2025 Date (फोटो सौजन्य -File Image)

Holi 2025 Date: दरवर्षीप्रमाणे, या वर्षीही होळी कधी साजरी होईल याबद्दल बराच गोंधळ आहे. होळी 13 मार्च रोजी साजरी होईल की 14 मार्च रोजी, हा सध्या बराच चर्चेचा विषय आहे. काही ठिकाणी 13 मार्च रोजी होळी साजरी केली जात आहे, तर काही ठिकाणी 14 मार्च रोजी होळी साजरी केली जाईल. होळी, होलिका दहन आणि धुलिवंदन कधी आहे? ते जाणून घ्या...

होळी कधी साजरी होईल? शुभ मुहूर्त जाणून घ्या

यंदा 13 मार्च रोजी होळीचा सण साजरा केला जाईल. ज्यामध्ये पौर्णिमा तिथी सकाळी 10.35 पासून सुरू होईल. पण भद्रा 10.36 वाजता सुरू होईल, जो रात्री 11.31 पर्यंत चालेल. ज्यामुळे होळीवर भद्राची सावली राहील. म्हणून, होळी पूजा आणि दहन करण्यासाठी शुभ वेळ रात्री 11.32 ते 12.37 पर्यंत आहे. पौर्णिमेसोबतच भद्रा 13 मार्च रोजी सकाळी 10.36 वाजता सुरू होईल आणि रात्री 11.31 वाजेपर्यंत चालेल. (वाचा - Holika Dahan 2025: होलिका दहनाच्या दिवशी चुकूनही करू नका या गोष्टी, जाणून घ्या, संपूर्ण माहिती)

धुलिवंदन कधी आहे?

होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरे केले जाते. यंदा होळी 13 मार्च रोज असल्याने 14 मार्च रोजी धुलिवंदन साजरे करण्यात येईल. पौर्णिमेची तारीख 14 मार्च रोजी रात्री 12:25 वाजेपर्यंत राहील.

होळी आणि रंगोत्सवाचा नियम असा आहे की ज्या दिवशी फाल्गुन पौर्णिमा तिथी प्रदोष काळातील असते, त्याच रात्री होलिका दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगोत्सव साजरा केला जातो. या नियमानुसार, यावर्षी 13 मार्च रोजी होलिका दहन केले जाईल आणि 14 मार्च रोजी रंगोत्सव धुलिवंदनाचा उत्सव साजरा केला जाईल.