
Chhatrapati Sambhaji Maharaj Punyatithi 2025 HD Images: छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जीवनावर आधारित छावा या चित्रपटाने सध्या सर्वांची मनं जिंकली आहेत. या चित्रपटात संभाजी मराराजांनी धर्मासाठी दिलेलं बलिदान तसेच भोगलेल्या यातना प्रत्येकाला हादरून सोडतात. खर तर या चित्रपटाचा उल्लेख करण्याचा उद्देश म्हणजे आज छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी (Chhatrapati Sambhaji Maharaj Punyatithi 2025) साजरी होत आहे. मुघल प्रशासक औरंगजेबाने केलेल्या छळानंतर 11 मार्च 1689 रोजी संभाजी महाराजांचा मृत्यू झाला होता. संभाजी महाराजांनी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या धर्मासाठी यातना भोगल्या.
औरंगजेबाने प्रचंड अत्याचार करूनही संभाजी महाराजांनी मुस्लिम धर्माचा स्विकार करण्यास नकार दिला. त्यांचे हे बलिदान आज प्रत्येकाला धर्माचे रक्षण करण्यासाठी प्रेरणादायी ठरते. आज आम्ही तुमच्यासाठी संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त Messages, Wishes, WhatsApp Status घेऊन आलो आहोत. तुम्ही ते सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करून स्वराज्य रक्षक शंभूराजांना विनम्र अभिवादन करू शकता.
छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी व्हॉट्सअप स्टेटस -
छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

मराठा साम्राज्याचे दूसरे छत्रपती,
शिवपुत्र संभाजी महाराज यांना
पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन

महत प्रतापी शिवरायांचा
शूरवीर छावा
वंदन करितो बलिदानाला
जय 'शंभूराया'
छत्रपती संभाजी महाराज यांना
पुण्यतिथि निमित्त कोटी कोटी प्रणाम!

वीर योद्धा, कुशल सेनापती,
छत्रपती संभाजी महाराज यांना
पुण्यतिथि निमित्त कोटी कोटी प्रणाम!

मृत्यूला मारण्याचा होता कावा,
हे धाडस बाळणारा फक्त तोच एक छावा
छत्रपती संभाजी महाराज यांना
पुण्यतिथि निमित्त कोटी कोटी प्रणाम!

संभाजी राजे भोसले यांचे जीवन प्रत्येक पिढीसाठी प्रेरणास्त्रोत म्हणून काम करते. त्यांचे जीवन आपल्याला अत्याचाराविरुद्ध खंबीरपणे उभे राहण्याचे आणि स्वतःच्या तत्त्वांचे रक्षण करण्याचे महत्त्व अधोरेखित करून देते. संभाजी महाराजांचा वारसा अजूनही स्वातंत्र्य, न्याय आणि धार्मिक सहिष्णुता या मूल्यांचे समर्थन करणाऱ्या सर्वांसाठी धैर्य आणि लवचिकतेचा दीपस्तंभ म्हणून काम करतो.