
केरळच्या Thalassery मध्ये 18 वर्षीय मुलीचा सहा महिने वजन घटवण्याच्या नादात केवळ पाण्यावर राहण्याचा उपाय जीवावर बेतला आहे. ही मुलगी 'Anorexia'या eating disorder शी झुंजत असताना एका हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असताना मृत पावली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, वजन घटवण्यासाठी ती ऑनलाईन पोर्टलची मदत घेत होती. यामध्ये तिने अन्न सोडून केवळ पाणी घेतले होते. मागील सहा महिने अन्न पोटात न गेल्याने तिच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला होता.
NDTV च्या वृत्तानुसार, Thalaserry Co-operative Hospital,च्या Dr Nagesh Manohar Prabhu यांनी दिलेल्या माहितीत 18 वर्षीय तरूणीला 12 दिवसांपूर्वी हॉस्पिटल मध्ये आणण्यात आले. तिला थेट आयसीयू मध्ये दाखल केले होते. बेडरिडन अवस्थेत असलेल्या या तरूणीचं वजन अवघं 24 किलो होते. तिच्या शरीरात रक्तातील साखरेचं प्रमाण, बीपी, सोडीयम चं प्रमाण कमी होते. ती व्हेंटिलेटर सपोर्ट वर नव्हती पण तिची प्रकृती सुधारू शकली नाही आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.
Anorexia आजार काय आहे?
Anorexia ही एक ईटिंग डिसऑर्डर आहे. यामध्ये रूग्ण त्यांच्या खाणयाबाबत आणि वजनाबाबत विचित्र वागतो. दरम्यान रूग्ण बारीक असला तरीही त्याला आपण ओव्हरवेट असल्याचं वाटतं आणि आपसूकच तो खाणं कमी करतो.
दरम्यान केरळ मधील मृत तरूणी मागील 5-6 महिन्यांपासून कमी खात होती आणि तिने हे कुटुंबापासूनही लपवले होते. दोन महिन्यांपूर्वी तरूणीला Kozhikode Medical College Hospital मध्ये नेण्यात आले होते. तेथे तिच्यावर काही टेस्ट झाल्या. डॉक्टरांनी तिच्या कुटुंबाला तिला योग्य खाण्याचा आणि मानसिक उपचारांचा सल्ला दिला होता.
दोन आठवड्यांपूर्वी तिची ब्लड शूगर कमी झाली. श्वसनाला त्रास होऊ लागल्याने तातडीने हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. उपचारातच तिची प्राणज्योत मालवली. What is Metabolism? मेटाबॉलिझम म्हणजे काय? त्याचे महत्त्व काय? ते अधिक सक्षम कसे करायचे?
दुर्दैवाने, अनेक सामान्य नागरिक, सेलिब्रिटीज anorexia nervosa, किंवा AN ने पीडीत असतात. anorexia nervosa जो एक गंभीर मानसिक आजार आहे. यामध्ये वजन, शरीरयष्टी आणि आत्मसन्मानाबद्दल त्या व्यक्तीला जास्त चिंता असते. खाण्याचा विकार, आहारावर बंधने, हेतुपुरस्सर उलट्या आणि तीव्र थकवा जाणवणं ही AN ची लक्षणे आहेत.