MNS: भोंगे उतरवले, मनसे नेता महेंद्र भानुशाली पोलिसांच्या ताब्यात
MNS Chief Raj Thackeray | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) कार्यालयांवर लावण्यात आलेले भोंगे मुंबई पोलिसांनी सक्रीय होत खाली उतरवले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानावरुन केलेल्या भाषणामध्ये मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्हीही भोंगे लावून त्यावर हनुमान चालीसा लावू, असा इशारा दिला होता. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी लगेचच आपापल्या कार्यालयांवर भोंगे लावून त्यावर हनुमान चालीसा लावल्या. अशा प्रकारे भोंगे लावणाऱ्या मसने कार्यकर्त्यांना पोलिसांनी आगोदर समज दिली. त्यानंतरही भोंगे सुरुच राहिल्याने पोलिसांनी हे भोंगे उतरवले. दरम्यान चांदिवली मतदारसंघातील मनसे नेता महेंद्र भानुशाली यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.

दरम्यान, घाटकोपर परिसरातही काही मनसे कार्यालयांवर भोंगे पाहायला मिळाले. तेही भोंगेही पोलिसांनी खाली उतरवले. कोणत्याही प्रकारची परवानगी न घेताल भोंगे लावल्याने पोलिसांनी हे भोंगे खाली उतरवले आहेत. कालच्या सभेत राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवा नाहीतर आम्ही भोंगे लावू असा इशारा दिला होता. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी भोंगे लावण्यास सुरुवात केली. दरम्यान, हे भोंगे पोलिसांनी उतरवल्यानंतर आता राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. (हेही वाचा, Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या भाषणावर सुप्रिया सुळे, जयंत पाटील, छगन भुजबळ, किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंगे लावण्याचा इशारा दिल्यानतर त्यावर जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी राज ठाकरे हे दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करत आहेत. त्यामुळे ते एक प्रकारे धर्मांधांना मदत करत असल्याचा आरोप होतो आहे. तर, दुसऱ्या बााजूला भाजपसारख्या पक्षांनी राज ठाकरे यांचे स्वागत केले आहे. राज ठाकरे जे बोलले ते बरोबर आणि सत्यच बोलले असे मत भाजप नेत्यांनी व्यक्त केले आहे.