Ladki Bahin Yojana | (Photo credit: archived, edited, representative image)

नागपूर येथे झालेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये 33,788.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी देण्यात आली. ज्यामुळे लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) पुढेही कायम सुरु राहणार हे निश्चित झाले. कारण पुरवणी मागण्यांमध्ये या योजनेसाठीही 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सरकारमधील मंत्री उदय सामंत यांनी 16 डिसेंबर रोजी विधानसभेत सादर केलेल्या मागण्या सविस्तर चर्चेनंतर कनिष्ठ सभागृहात मंजूर करण्यात आल्या. या पूरक मागण्या सुरुवातीच्या अर्थसंकल्पीय तरतुदींव्यतिरिक्त सरकारने विनंती केलेल्या अतिरिक्त निधीसाठी करण्यात आल्या आहेत.

पुरवणी मागण्यांतील प्रमुख दरतुदी

लाडकी बहीण योजना:

मुख्यमंत्री बळीराजा योजनाः

  • या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी 3,050 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

प्रमुख पायाभूत सुविधा आणि विकास निधी वाटप

  • सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी): 7,490 कोटी रुपये.
  • नगरविकास विभागः 2,774 कोटी रुपये
  • ग्रामीण विकास विभागः 2,007 कोटी रुपये
  • आदिवासी विकास विभागः 1,830 कोटी रुपये
  • उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागः 4,112 कोटी रुपये

इतर उल्लेखनीय तरतुदीः

लाडकी बहीण योजना आणि राजकीय परिणाम

हिवाळी अधिवेशनात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना यशस्वी ठरल्याचे सांगत योजनेचे जोरदार कोतुक केले. ते म्हणाले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीस भरघोस यश मिळण्याचे श्रेय लाडकी बहीण योजनेसच जाते. योजनेचा राजकीय परिणाम असा झाला की, युतीला 288 पैकी 230 पेक्षा जास्त जागा मिळाल्या, ज्यात भाजपने 132, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) 57 आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (यूबीटी) केवळ 20 जागा, काँग्रेस 16 आणि शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी (SP) 10 जागा जिंकत विरोधी आघाडी महा विकास आघाडीला (एमव्हीए) मोठा तोटा सहन करावा लागला.