Ladki Bahin Yojana December Installments: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांच्या मनात असलेल्या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूर येथे दिले. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session) सुरु आहे. या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्र्यांनीच या योजनेचा पुढचा हप्ता केव्हा येणार याबाबत माहिती दिली. तसेच, ही योजना प्रचंड यशस्वी झाल्याचे सांगून ती बंद केली जाणार नाही. इतकेच नव्हे तर महायुती सरकारने दिलेल्या कोणत्याच आश्वासनांपैकी कोणतीच योजना बंद केली जाणार नसल्याचा पुनरुच्चार फडणवीस यांनी केला.
लाडकी बहीण योजना निधीची रक्कम वाढणार?
विधानसभा निवडणूक 2024 च्या प्रचारादरम्यान आणि आता सत्तेवर आल्यानंतर महायुतीने सरकारने लाडकी बहीन योजना आता अधिक गतमीना करणार असल्याचे म्हटले आहे. इतकेच नव्हे तर या योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या 1500/- रुपयांच्या निधीमध्ये वाढ करत तो आकडा आता 2100/- रुपये करणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही याबाबतचा पुनरुच्चा करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत तजवीस जोणार असल्याचे समजते. दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 35 हजार 788 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. त्यातच लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. परिणामी या मागण्या आणि तरतूद राज्याच्या तिजोरीवर किती बोजा टाकणार याबाबत तज्ज्ञांमध्ये भीती आहे. (हेही वाचा, Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, एक मोठ्ठे ठिगळ? इतर विभागांच्या निधीला कात्री?)
डिसेंबरचा हाप्ता पुढच्या वर्षी?
दरम्यान, सर्वांचे लक्ष लागून राहिलेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता केव्हा येणार याबाबत बोलताना मुख्यमंत्री सभागृहात म्हणाले की, सध्या राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु आहे. हे अधिवेशन संपल्यानंतर या योजनेचा डिसेंबर महिन्यातील हप्ता दिला जाईल. दरम्यान, राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबरपासून सुरु झाले आहे. ते 21 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे अधिवेशन संपल्यानंतर प्रशासनाला सूचना जातील आणि त्यावरुन कार्यवाही केली जाईल. त्यामुळे सरकारी कामकाजाची गती पाहता हा हप्ता डिसेंबर 2024 च्या शेवटच्या आठवड्यात येऊ शकेल अन्यथा लाभार्थ्यांना थेट पुढच्या वर्षी म्हणजे 2024 च्या पहिल्या आठवड्यातच मिळू शकेल असे दिसते.
दरम्यान, ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार सत्तेत असताना सुरु करण्यात आली. या योजनेपोटी राज्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यावर दरमहा 15000 रुपयांची रक्कम थेट जमा केली जाते. या योजनेचा आतपर्यंत कोट्यवधी महिलांनी घेतला आहे. अनेक महिलांची तर या वर्षातील दिवळी पार पडली. ऐन दिवाळीत या महिलांना 3 हजार रुपयांचा दिवाळी बोनस मिळाला. ज्याचा मोठा फायदा भाजप आणि महायुती घटक पक्षांना विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाला.