कल्याण-डोंबिवलीत कोरोनाबाधितांचा आकडा 9 हजारांवर पोहचला, परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता
Coronavirus | (Photo Credits: Pixabay.com)

कल्याण डोंबिवली (Kalyan-Dombivali) हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला असून तेथे प्रचंड वेगाने रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. 6 मे पर्यंत या ठिकाणची कोरोनाची परिस्थिती महापालिकेच्या नियंत्रणात असल्याचे दिसून आले होते. त्यावेळी कोरोनाचे फक्त 233 रुग्ण होते. परंतु आता कल्याण-डोंबिवलीतील कोरोनाबाधितांचा आकडा 9 हजारांच्या पार गेला आहे. मंगळवार पर्यंत आलेल्या कोरोनाच्या आकडेवारीनुसार कल्याण-डोंबिवलीत 13,576 रुग्णांची संख्या असून 207 जणांचा बळी गेला आहे. अॅक्टिव रुग्णांची संख्या 6,433 ऐवढी आहे. कल्याण-डोंबिवली मधील कोरोनाची परिस्थिती ठाण्याला टक्कर देणारी ठरत असून हा मुंबईतील मेट्रोपोलिटिन रिजनमधील सर्वात मोठा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. त्यामुळे येत्या काळात येथील परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता केंद्र सरकारने व्यक्त केली आहे.

कल्याण-डोंबिवलीत वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावासाठी रहिवाशी आणि कार्यकर्त्यांनी महापालिकेला दोषी ठरवले आहे. तसेच केडीएमसीच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी प्रतिभा पानपाटील यांनी असे म्हटेल आहे की, नगरसेवकांना त्यांच्या स्थानिक परिसरातील नागरिकांमध्ये लक्षणे दिसून आल्यास त्यांना तातडीने फिव्हर क्लिनिकमध्ये पाठवण्यात यावे अशा सुचना दिल्या आहेत. परंतु कल्याण मधील स्थानिक रहिवाशी अरुण नायक यांनी असे म्हटले आहे की, अधिकाऱ्यांकडून परिवारातील नागरिकांची चाचणी करण्यात येत नसून अन्य रुग्णांबद्दल सुद्धा काही माहिती देत नाहीत.(Coronavirus Update: तुमच्या जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण? महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी पहा)

दुसऱ्या एका रहिवाश्याने असे म्हटले की, कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर त्यांना कोविडची चाचणी करायची होती. तसेच त्यांचे केशरी रंगाचे रेशन कार्ड असल्याने कोरोनाची चाचणी फ्री करण्यात येणार असल्याचा नियम आहे. परंतु प्रत्येक ठिकाणी कोरोनाच्या चाचणी बाबत विचारले असता त्यांनी 2500 रुपये स्विकारले जातील असे म्हटले. नायक यांनी पुढे असे म्हटले आहे की, प्रत्येक व्यक्तीला खासगी प्रयोगशाळेत कोरोनाची चाचणी करुन घेणे परवडण्यासारखे नाही आहे. त्याचसोबत कोरोनाबाधित रुग्णांबाबत विचित्र घटना ऐकल्यानंतर लक्षण दिसून आलेल्या व्यक्ती चाचणी करण्यासाठी सुद्धा पुढे येत नाहीत असे ही रहिवाश्याने म्हटले आहे.(ठाण्यात COVID19 चा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोरोनामुक्त झालेल्या नर्सला इमारतीमधील रहिवाशांनी प्रवेशासाठी नाकारले)

केडीएमसी यांची स्वत:ची कोरोनाची चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळा नाही आहे. त्यामुळे खासगी प्रयोगशाळेत चाचणीसाठी दिले असता त्यासाठी 36 तास घालवले जातात. तो पर्यंत रहिवाशी आणि कोरोनाची लक्षणे आढळलेल्या व्यक्ती मुक्तपणे फिरत असल्याचे ही सांगण्यात आले आहे.