Coronavirus Update: तुमच्या जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण? महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी पहा
Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा उद्रेक अद्याप सुरु आहे. याच उद्रेकात आजपर्यंत 10 हजाराहून अधिक जणांनी प्राण गमावले आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2,67,665 झाली आहे. सद्य घडीला राज्यात 1,07,665 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यातील दिलासादायक भाग असा की, कोरोनाला हरवणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या 1,49,007 इतकी झाली आहे. राज्यात कोरोना रिकव्हरी रेट हा 55 टक्क्यांहून अधिक असल्याने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येतेय. महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रमुख हॉटस्पॉट मुंबई शहरात सुद्धा मागील काही काळात पहिल्यांदा 1000 हुन कमी कोरोना रुग्ण समोर आले आहेत, त्यामुळे मुंबई हळूहळू कोरोनावर मात करण्याच्या मार्गावर आहे असा अंदाज लावायला हरकत नाही. मुंबई (Mumbai) सहितच ठाणे (Thane) , पुणे (Pune), रायगड (Raigad) , औरंगाबाद (Aurangabad) , या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत हे जाणून घ्या.

Coronavirus Update: मागील 24 तासात 29,429 कोरोना रुग्णांची आणि 582 मृत्यूंची नोंद, देशातील कोरोना बाधितांची संख्या 9,36,181 वर

महाराष्ट्रातील कोरोना बधितांची जिल्हानिहाय आकडेवारी (15 जुलै)

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 95,100 5405
2 ठाणे 8876 179
3 ठाणे मनपा 15,414 597
4 नवी मुंबई मनपा 11,343 303
5 कल्याण डोंबिवली मनपा 15,510 224
6 उल्हासनगर मनपा 4825 82
7 भिवंडी निजामपूर मनपा 3051 186
8 मीरा भाईंदर 6305 198
9 पालघर 1948 22
10 वसई विरार मनपा 8278 180
11 रायगड 4616 65
12 पनवेल मनपा 4494 102
ठाणे मंडळ एकूण 1,79,760 7543
1 नाशिक 1797 73
2 नाशिक मनपा 4665 148
3 मालेगाव मनपा 1201 85
4 अहमदनगर 593 21
5 अहमदनगर मनपा 387 5
6 धुळे 823 44
7 धुळे मनपा 787 34
8 जळगाव 4789 298
9 जळगाव मनपा 1566 63
10 नंदुरबार 282 11
नाशिक मंडळ एकूण 16,890 782
1 पुणे 3985 113
2 पुणे मनपा 30,751 907
3 पिंप्री-चिंचवड मनपा 7356 132
4 सोलापूर 964 39
5 सोलापूर मनपा 3514 318
6 सातारा 1855 69
पुणे मंडळ एकुण 48,425 1578
1 कोल्हापूर 1196 20
2 कोल्हापूर मनपा 126 0
3 सांगली 534 13
4 सांगली मिरज कुपवाड मनपा 114 6
5 सिंधुदुर्ग 262 5
6 रत्नागिरी 916 32
कोल्हापूर मंडळ एकुण 3148 76
1 औरंगाबाद 2030 37
2 औरंगाबाद मनप 6629 308
3 जालना 1084 47
4 हिंगोली 344 2
5 परभणी 121 6
6 परभणी मनपा 106 1
औरंगाबाद मंडळ एकूण 10,314 401
1 लातूर 445 28
2 लातूर मनपा 313 8
3 उस्मानाबाद 410 17
4 बीड 241 5
5 नांदेड 228 11
6 नांदेड मनपा 411 16
लातूर मंडळ एकूण 2048 86
1 अकोला 397 24
2 अकोला मनपा 1503 71
3 अमरावती 118 8
4 अमवरावती मनपा 798 29
5 यवतमाळ 469 14
6 बुलढाणा 420 17
7 वाशीम 253 5
अकोला मंडळ एकूण 3958 168
1 नागपूर 337 3
2 नागपूर मनपा 1819 20
3 वर्धा 44 1
4 भंडारा 175 2
5 गोंदिया 217 3
6 चंद्रपूर 139 0
7 चंद्रपूर मनपा 45 0
8 गडचिरोली 136 1
नागपूर मंडळ एकूण 2912 30
इतर राज्य 210 31
एकूण 2,67,665 10,695

दरम्यान, कोरोनाच्या लढ्यात अग्रगण्य असणाऱ्या डॉक्टर आणि पोलीस वर्गाला सुद्धा या विषाणूचा जबरदस्त फटका बसला आहे. प्राप्त माहितीनुसार, मागील केवळ तीन दिवसातच महाराष्ट्रात 4  पोलिसांचा कोरोनाने बळी गेला आहे तर एकूण मृतांची संख्या ही 82 इतकी आहे. तसेचदेशभरात एकूण 93 डॉक्टरांचा कोरोनाशी लढताना मृत्यू झाला आहे.