Coronavirus Update: मागील 24 तासात 29,429 कोरोना रुग्णांची आणि 582 मृत्यूंची नोंद, देशातील कोरोना बाधितांची संख्या 9,36,181 वर
Coronavirus (Photo Credit: Twitter)

Coronavirus Update In India: देशात कोरोना व्हायरसचा प्रसार झपाट्याने होत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत मागील 24 तासात आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ झाल्याचे समजत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मागील 24 तासात देशात 29,429 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 582 मृत्यू झाला आहे. यानुसार देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 9,36,181 वर पोहचला आहे. यापैकी, यापैकी 3,19,840 ऍक्टिव्ह प्रकरणे आहेत, 5,92,032 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 24,309 जणांचा आजवर मृत्यू झाला आहे. देशात कोरोना रिकव्हरी रेट 63.20 टक्क्यांवर पोहचला असून रिकव्हरी आणि मृत्य दराची सरासरी पाहिल्यास 96.05टक्के : 3.95 टक्के अशी असल्याचे सुद्धा आरोग्य विभागाने सांगितले आहे.

दुसरीकडे, आयसीएमआर च्या माहितीनुसार, देशात 14 जुलै पर्यंत एकूण 1,24,12,664 कोरोना चाचण्या पार पडल्या आहेत, यापैकी तब्बल 3,20,161 चाचण्या या कालच्या दिवसभरात घेण्यात आल्या आहेत.

ANI ट्विट

इंडियन मेडिकल असोसिएशन च्या माहितीनुसार, देशातील कोरोना व्हायरस लढ्यात ड्युटीवर असताना 93 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. आयएमएचे प्रमुख डॉ. राजन शर्मा (Dr. Rajan Sharma) म्हणाले की, ताज्या माहितीनुसार आतापर्यंत 1,279 डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच पोलिसांमध्ये सुद्धा कोरोना व्हायरसचा प्रसार वाढत आहे.