
मुंबईत रेल्वे रुळांवर अनधिकृत बांधकामे आणि झोपडपट्ट्यांची संख्या गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे. मुंबईत रेल्वे रुळांवर सुमारे 7 हजार बेकायदा झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या आहेत. मात्र, रेल्वे मंत्रालयाने आता या अनधिकृत झोपडपट्ट्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे. मालाड, कांदिवली स्टेशन आणि मुंबईतील इतर अनेक रेल्वे रुळांमधील झोपड्यांनवर कारावाई करण्यात येते आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने झोपडपट्टीवासीयांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. मात्र रेल्वेने पर्यायी निवास व्यवस्था न करता पोलिसांच्या मदतीने सर्व झोपडपट्ट्या हटवल्या आहेत. शेकडो कुटुंबांवर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. मात्र, गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज रेल्वे मंत्रालयाच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली. जोपर्यंत रेल्वे मंत्रालय त्यांचे पुनर्वसन करत नाही, तोपर्यंत झोपडपट्ट्या हटवू नयेत, असे ते म्हणाले.
Tweet
अचानक असे काय झाले कि त्यांना घरे खाली करण्याच्या नोटीसा काढण्यात आल्या तेही 7 दिवसांत. पर्यायी व्यवस्था करा आणि त्याच्या नंतरच ते घरे खाली करतील. अन्यथा आम्ही त्या गोर गरीब लोकांबरोबर उभे राहू. मनामनी चालणार नाही.@Central_Railway
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 18, 2022
झोपडपट्टीवासीयांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, तरच ते घरे पाडतील. नाहीतर आम्ही त्या गरीब लोकांच्या पाठीशी उभे राहू. मनामनी चालणार नाही. असे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. (हे ही वाचा Special PMLA Court ने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री Anil Deshmukh यांचा जामीन फेटाळला)
आज मुंबई, सीएसएमटी, वांद्रे, कुर्ला, मालाड, कांदिवली, गोरेगाव, माटुंगा, माटुंगा रोड, दादर, मस्जिद, विक्रोळी येथे रेल्वे मार्गालगत आणि रेल्वे हद्दीत झोपडपट्ट्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या बेकायदा बांधकामावर रेल्वेकडून वेळोवेळी कारवाई करण्यात येते.