कोकण किनारपट्टीवर मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. यापूर्वी अपवाद वगळता फारसे कधी न आढळलेले विषारी जेलीफिश कोकण समुद्र किनाऱ्यावर (Jellyfish On Maharashtra's Konkan Coast) आढळून येऊ लागले आहेत. हे जेलीफिश प्रामुख्याने सिंधुदुर्ग (Sindhudurg), रत्नागिरी (Ratnagiri), रायगड (Raigad) जिल्ह्यातील किनारपट्टीवर आढळून येत आहेत. कोकणातील मच्छिमार मच्छिमारी (Fishing) करण्यासाठी खोल समुद्रात जातात. त्यांना मासळीही तितक्याच विपूल प्रमाणात मिळते. परंतू पाठिमागील काही दिवसांपासून मच्छिमारांच्या जाळ्यामध्ये विषारी असे जेलीफिश आढळून येत आहेत. त्यामुळे आगोदरच संकटात असलेल्या मच्छिमारांसमोर नवेच संकट उभे राहिले आहे.
कोकणाला थोडाथोडका नव्हे तर तब्बल 720 किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. या किनारपट्टीवरील बहुतांश नागरिकांचा मच्छिमारी हाच उदरनिर्वाचा व्यवसाय आहे. त्यामुळे जेलीफिशचे प्रमाण जर असेच वाढत राहिले तर आगामी काळात मच्छिमारी कशी करायची असा सवाल या लोकांसमोर आहे. जेलीफिशचे प्रमाण वाढल्याने आताच मासळी उत्पन्न घटू लागले आहे. भविष्यात मासळी कशी मिळवायची ही चिंता या मच्छिमारांना सतावू लागली आहे. (हेही वाचा, Blue Bottle Jellyfish: मुंबईकरांना सावध राहण्याचे आवाहन; जुहू बीचवर आढळले विषारी 'ब्लू बॉटल जेलीफिश'; जाणून घ्या डंख मारल्यास कशी घ्यावी काळजी)
जेलीफिश हा दिसायला मशरुमसारखा असतो. डोके मोठे आणि त्याच्या शरीरातून द्रव पदार्थासारखे निघणारे सुक्ष्म आणि लाबच लांब काटे विषारी असतात. हा मासा एखाद्या बुळबुळीत पदार्थासारखा असतो. जेलीफिशचा डंख झाल्यास आणि वेळीच उपचार न झाल्यास व्यक्ती दगावण्याची शक्यता असते. बहुतेकदा जेलीफिशच्या डंकांमुळे त्वचेवर झटपट वेदना होतात आणि सूज येते. काही डंकांमुळे संपूर्ण शरीर तीव्र वेधनेने बधीर होते णि क्वचित प्रसंगी ते जीवघेणे ठरते
मच्छिमार सांगतात की, जेलीफिशचा डंख झाल्यास अंगाला, हातापायांना खाज सुटते. जेलीफिश विषारी असल्याने त्याचा मासळी मिळण्यावरही परिणाम होतो. त्यामुळे मत्स्य उत्पादनात मोठी तूट निर्माण होते. सहाजिकच बाजारात मिळणाऱ्या मासळीचे भाव वधारतात.