Harish Salve | Twitter @UtkarshSingh_

भारताचे माजी सॉलिसिटर जनरल हरिश साळवे (Harish Salve) तिसर्‍यांदा बोहल्यावर चढले आहेत. ब्रिटिश नागरिक असलेल्या Trina सोबत हरिश साळवे विवाहबद्ध झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या लग्नसोहळ्याचे काही फोटोज, व्हिडिओज सध्या सोशल मीडीयामध्ये शेअर केले जात आहे. हरिश साळवे यांच्या लग्नाला नीता अंबानी, ललित मोदी, उज्ज्वला राऊत यांच्यासह काही बहुप्रतिष्ठित भारतीयांनीही हजेरी लावली होती.

मराठी कुटुंबातील हरिश साळवे यांचे वडील सीए तर आई डॉक्टर होती. हरिश साळवे यांनी 38 वर्षांच्या संसारानंतर पहिली पत्नी मीनाक्षी सोबत घटस्फोट घेतला. त्यानंतर 2020 मध्येच ते ब्रिटीश महिला Caroline Brossard सोबत विवाहबद्ध झाले होते मात्र आता पुन्हा तिसर्‍यांदा ते लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. ब्रिटन मध्येच हरीश साळवे यांचा खाजगी विवाह सोहळा पार पडला.

68 वर्षीय हरीश साळवे हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करतात. देशातील अनेक हाय प्रोफाईल खटल्यांमध्ये त्यांचा सहभाग होता. सलमान खानचं हिट अ‍ॅन्ड रन प्रकरण ते कुलभूषण जाधवच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात त्यांनी बाजू मांडली आहे. रिलायंस, टाटा समुह हे त्यांचे क्लायंट आहेत.

हरिश साळवे हे जगातील महागडे आणि व्यग्र वकिलांपैकी एक आहेत. नोव्हेंबर 1999 ते नोव्हेंबर 2002 पर्यंत ते भारताचे सॉलिसिटर जनरल होते. नंतर साळवे यांची जानेवारीमध्ये वेल्स आणि इंग्लंडच्या न्यायालयांसाठी राणीचे वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.