Giloy | (Photo Credits: ANI)

ठाणे (Thane) जिल्ह्यील जंगलात आढळणाऱ्या औषधी वनस्पती या जिल्ह्यातील आदिवासी (Tribals) नागरिकांसाठी मोठा आधार ठरत आहे. प्रामुख्याने गुळवेल (Gulve) ही वनस्पती इथल्या आदिवासी पाडे आणि नागरिकांसाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची ठरते आहे. देशभरात सध्या कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारी मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दाखवत आहे. अशा काळात औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींना राज्य आणि देशभरातून मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे. त्याचा फायदा ठाणे जिल्ह्यातील आदिवासी मिळताना दिसतो आहे. ठाणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गुळवेल (Giloy) चांगल्या प्रतीची मिळते, असे देशभरातील व्यापाऱ्यांच्याही लक्षात आले आहे. त्यामुळे ठाण्यातील गुळवेलीस मागणी वाढते आहे.

ठाणे जिल्ह्यात आदिवासी एकात्मिक सामाजिक संस्था जिल्ह्यातील आदिवासींसाठी रोजगारनिर्मिती करु पाहते आहे. पंतप्रधान वनधन विकास योजना आणि शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून ही रोजगारनिर्मिती करण्याचा प्रयत्न आहे. काही प्रमाणात त्याला प्रतिसाद मिळतानाही दिसतो आहे. वृत्तसंस्था आयएएसनेही याबाबत वृत्त दिले आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील आदिवासी एकात्मिक सामाजिक संस्थेचे सुनील पवार यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, त्यांच्या संस्थेला नुकतीच 1 कोटी 57 हजार रुपयांची गुळवेल पुरवठ्याबाबत ऑर्डर मिळाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर ऑर्डर मिळाल्यामुळे आदिवासी समाजातील अनेक कुटुंबांसाठी आर्थिक हातभार लागू शकतो. हे प्रमाण पुढे असेच वाढल्यास आदिवासिंसाठी हा एक मोठा अर्थिक आधार ठरु शकतो, असेही पवार सांगतात. (हेही वाचा, http://cmsmarathi.letsly.in/lifestyle/health-wellness/amazing-benefits-of-giloy-know-more-health-benefits-214661.html)

एका अभ्यासानुसार भारतीय जंगलात सुमारे 45 हजारांहून अधिक वनस्पतींचे प्रकार आढळतात. यात शतवारी, अश्वगंधा, सर्पगंधा, आडुळसा, कळलावी, सफेद मुसळी, वेखंड, ब्राम्ही, गुळवेल, गुंज, वावाडिंग, रक्तचंदन, बिवळा, बिबा, हिरडा, बेहडा, आवळा, बेल, ऐन, सीताअशोख, अर्जुन, केवडा आदी वनस्पतींचा समावेश आहे.