Amazing Benefits of Giloy: गुळवेलाचे सेवन केल्याने होतात 'हे' आरोग्यदायी फायदे; जाणून घ्या
Amazing Benefits of Giloy (फोटो क्रेडिट्स: इन्स्टाग्राम)

Amazing Benefits of Giloy: गुळवेल ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ज्याचा उल्लेख आयुर्वेदातही करण्यात आला आहे. याचा वापर शतकानुशतके औषधात होत आला आहे. गुळवेलाला हिंदीमध्ये टीनोस्पोरा कॉर्डिफोलिया (Tinospora Cordifolia) किंवा गुडूची (Guduchi) म्हणून ओळखले जाते. गुळवेलामध्ये सापडणाऱ्या उच्च पौष्टिक सामग्रीमुळे आणि त्यामध्ये सापडलेल्या अल्कोलोइडमुळे तो अत्यंत प्रभावी मानला जातो. या वनस्पतीची मुळे आणि पानेदेखील लाभदायी असतात. चरक संहितामधील एका श्लोकानुसार, गुळवेळ कडू चव असलेल्या मुख्य औषधी वनस्पतींपैकी एक आहे. याचा वापर विविध विकारांमध्ये केला जातो. गुळवेलाचे सेवन केल्याने वात आणि कफ कमी होण्यास मदत होते.

संस्कृतमध्ये गुळवेलाला 'अमृता' म्हणून ओळखले जाते, ज्याचा शाब्दिक अर्थ 'अमरत्व' आहे. गुळवेलाला अमृता असे म्हटले गेले आहे, कारण त्यात औषधी गुण मुबलक आहेत. गुळवेळाची मुळे जास्तीत जास्त उपयुक्त आहेत. त्याचे फायदे आणि उपयोगांना एफडीए (अन्न व औषध प्रशासन) यांनी देखील मान्यता दिली आहे. तज्ञांच्या मते गुळवेल रस, पावडर किंवा कॅप्सूल स्वरूपात वापरला जाऊ शकतो. बरेच लोक काढ्यामध्ये गुळवेलाचा वापर करतात. आज या लेखातून गुळवेलाचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊयात...(वाचा - Coronavirus Vaccine Precautions: कोरोना लस घेण्याअगोदर किंवा नंतर मद्यपान केल्यास होऊ शकतात 'हे' दुष्परिणाम; जाणून घ्या काय आहे वैज्ञानिकांचं मत)

गुळवेलाचे सेवन कसे करावे?

आयुर्वेदानुसार, गुळवेलाचे सेवन पावडर किंवा रसच्या रूपात केले जाऊ शकते. आजकाल हे कॅप्सूल आणि रेडिमेड पावडरमध्येही उपलब्ध आहे.

1. तीव्र तापेवर उपचार :

गुळवेल तीव्र ताप कमी करण्यास मदत करतो. गुळवेल डेंग्यू, स्वाइन फ्लू आणि मलेरिया यासारख्या बर्‍याच रोगांवर फायदेशीर ठरतो. आयुर्वेदात तापाचे दोन प्रकार आहेत. यातील पहिला प्रकार अमा (अयोग्य पचनामुळे शरीरात विषारी पदार्थ तयार होणे) आणि दुसरा म्हणजे (Foreign Particles). गुळवेल तीव्र, वारंवार येणाऱ्या तापावर फायदेशीर ठरतो. गुळवेळ हा एक दाहक-विरोधी, अँटीपायरेटिक औषधी वनस्पती आहे. जी संसर्गाविरूद्ध लढण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतो. (Coronavirus Vaccination Process: तुम्हाला कोरोना लस घ्यायची आहे का? जाणून घ्या लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया)

डेंग्यू तापावर गुळवेल उपयुक्त :

गुळवेल एक अँटिपायरेटिक औषधी वनस्पती आहे. यामुळे डेंग्यू तापामध्ये प्लेटलेटची संख्या सुधारते आणि गुंतागुंत होण्याची शक्यता कमी होते. गुळवेलाचे नियमित सेवन केल्याने डेंग्यू झाल्यानंतर प्रतिकारशक्ती सुधारते. तसेच डेंग्यूचा ताप जलद कमी होण्यास मदत होते. प्लेटलेटची संख्या वाढवण्यासाठी गुळवेलाचा रस तुळशीच्या पानांसोबत उकळावा आणि तो प्यावा.

एलर्जीक तापावर गुणकारी -

गुळवेल हा एलर्जीक तापावर गुणकारी ठरतो. या तापामुळे सर्दी, शिंका येणे, श्वास घेण्यास अडचण, डोळ्यांना पाणी येणे आदी लक्षणं कमी होतात. ताप कमी करण्यासाठी, एक चमचा गुळवेल पावडर मधात मिसळा आणि जेवणापूर्वी ते खा.

कोरोना-विषाणूच्या संसर्गासाठी गुळवेल -

गुळवेल रोग प्रतिकारशक्ती वाढवू शकतो. विशेषत: कोरोना संक्रमणासारख्या विषाणूजन्य तापासाठी गुळवेल उपयुक्त ठरू शकतो. गुळवेलामुळे कोरोनामुळे संक्रमण कमी होऊ शकते, याचा पुरावा मिळालेला नसला तरी रुग्णांची त्याविरूद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती वाढवते. आपण दिवसातून दोनदा 4-6 आठवडे गुळवेल पावडर किंवा गुळवेल रस घेऊ शकता.

डोळ्यांची दृष्टी सुधारते -

गुळवेलाचे सेवन केल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते. याचा उपयोग पंचकर्मात सामान्यतः केला जातो. गुळवेल पावडर किंवा गुळवेल पाने पाण्यात उकळून हे पाणी थंड झाल्यावर ते डोळ्यावर लावा. असे केल्यास दृष्टी सुधारण्यास मदत होते. गुळवेल औषधी वनस्पतीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. तथापि, जेव्हा गुळवेल इतर मधुमेह औषधांसह घेतले जाते, तेव्हा यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होऊ शकते. गुळवेल रोगप्रतिकारक शक्ती अधिक सक्रिय करते.

टीप- या लेखात दिलेली माहिती ही केवळ आरोग्याशी संबंधित माहितीच्या उद्देशाने लिहिलेली आहे. कोणत्याही रोगाच्या उपचारांसाठी किंवा वैद्यकीय सल्ल्यासाठी याचा आधार घेऊ नये. आम्ही असा दावा करू शकत नाही की, लेखात नमूद केलेल्या टिप्स उत्तम प्रकारे कार्य करतील, म्हणून लेखात दिलेल्या कोणत्याही टिप्स किंवा सूचना अवलंबात आणण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.