Sambhaji Pawar | (File Photo)

'बिजली मल्ल' (Bijali Malla ) अशी ओळख असलेले माजी आमदार संभाजी पावर (Sambhaji Pawar) यांचे निधन झाले आहे. ते 80 वर्षांचे होते. सांगली (Sangli) येथील निवासस्थानी रविवारी (14 मार्च) रात्री उशिरा त्यांचे वृद्धापकाळाने निधन (Former MLA Sambhaji Pawar Passes Away) झाले. संभाजी पवार हे राजकीय नेते अथवा आमदार नंतर होते. आगोदर ते एक कसलेले मल्ल होते. ते कुस्ती करत असत तेव्हा समोरच्या पैलवानाला डोळ्याचे पाते लवते न लवते तो आस्मान दाखवत. त्यावरुनच त्याची ओळख 'बिजली मल्ल' अशी निर्माण झाली.

संभाजी पवार हे कुस्तीत आल्यापासूनच सर्वांच्या उत्सुकतेचा आणि कौतुकाचा विषय होते. त्यांना कुस्तीचे डाव घरातून मिळाले. त्यांचे वडील ‘वज्रदेही मल्ल’ हरी नाना पवार हे परिसरातील नामचीन पैलवान आणि वस्ताद होते. पुत्र संभाजी पवार हे देखील वडीलांच्या तालमीत तयार झाले. त्यांचे डाव इतके पक्क असत की ते फडात उतरले की डोळ्याचे पाते लवते न लवते तोवर समोरच्या पैलवानाला अस्मान दाखवत. त्यातूनच ते ‘बिजली मल्ल’ म्हणून ते प्रसिद्ध झाले. महाराष्ट्रासह कर्नाटक, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये संभाजी पवार यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर होता.

संभाजी पवार यांच्या पश्चात पत्नी, दोन पुत्र, बंधू, पुतणे असा मोठा परिवार आहे. आज दुपारी 12 वाजता त्यांच्या राहत्या घरातून अंत्ययात्रा निघणार आहे. सांगली येथील मारुती चौकात दुपारी 1 वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाटी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. (हेही वाचा, First Hind Kesari Shripati Khanchnale Passes Away: हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे कोल्हापूर येथे निधन)

संभाजी पवार यांना कुस्तीत कमावलेल्या नावाच्या जोरावर राजकारणातही चांगला जम बसवता आला. त्यांनी माजी मुख्यमंत्री स्व. वसंत दादा पाटील यांचे पुतणे सहकारमहर्षी विष्णु अण्णा पाटील यांचा सांगली विधानसभा मतदारसंघात पराभव केला. तेव्हापासून त्यांना जायंट किलर म्हणूनही ओळखले जाऊ लागले. सुरुवातीला ते जनता दल पक्षात होते. त्यांची कामगीर पाहून त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेशची जबाबदारीही सोपविण्यात आली होती.

दरम्यान, संभाजी पवार यांनी 2009 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्य प्रवेश केला. त्यांच्यावर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सोपविण्यात आली होती. 2014 मध्ये त्यांचे आणि स्थानिक नेत्यांचे काहीसे मतभेद झाले. तेव्हापासून सक्रीय राजकारणातून ते काहीसे बाजूला झाले. परंतू, जनतेच्या प्रश्नावर ते नेहमी आवाज उठवत राहिले.