First Hind Kesari Shripati Khanchnale Passes Away: हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे कोल्हापूर येथे निधन
Hind Kesari Shripati Khanchnale | (File Photo)

महाराष्ट्रातील क्रीडा वर्तुळातून एक धक्कादायक बातमी आहे. कुस्तीपटू आणि पहिले हिंदकेसरी (Hind Kesari) श्रीपती खंचनाळे यांचे आज (सोमवार, 14 डिसेंबर 2020) निधन ( First Hind Kesari Shripati Khanchnale Passes Away) झाले आहे. ते 86 वर्षांचे आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त होते. कोल्हापूर येथे महावीर महाविद्याल परिसरातील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्रीपती हंचनाळे (Shripati Khanchnale) यांच्या निधनामुळे कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात आणि क्रीडा वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. हंचनाळे यांच्या निधनाचे वृत्त कळताच कोल्हापूरातील तालमीतील अनेक मल्लांनी ते दाखल असलेल्या रुग्णालयाकडे धाव घेतली. हंचनाळे यांचे पार्थिव शाहुपरी येथील तालमीत अंत्यदर्शनासाठी काही काळ ठेवले जाईल. त्यानंतर त्यांचे पार्थिव रुईकर कॉलनी येथील निवसस्थानी नेण्यात येणार आहे.

राज्यातील कुस्तीच्या आखाड्यात खंचनाळे यांचे नाव अत्यंत मानाने घेतले जाते. ते महाराष्ट्राचे पहिले हिंदकेसरी होते. इतकेच नव्हे तर त्यांनी आपल्या एकूण आयुष्यात अनेक मल्ल घडवले. अनेक मल्लांना तालमीत डाव घडवले. जे आज वस्तादांच्या रुपात वारसा चालवत नव्या मल्लांना तयार करत आहेत. (हेही वाचा, Breakdance in Olympics: ब्रेकडान्सिंगला मिळाला ऑलिम्पिक खेळाचा दर्जा; 2024 च्या पॅरिस खेळांमध्ये होणार समाविष्ट)

श्रीपती खंचनाळे हे अत्यंत गरीब कुटुंबातून आले होते.त्यांचे आई वडील एकसंबा या महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील गावचे रहिवासी होते. लहानपनापासूनच त्यांना कुस्ती आणि शारीरीक कसरतींची आवड होती. त्यांनी बालपणापासूच तालमीत शड्डू ठोकायला सुरवात केली. 1959 मध्ये पंजाब केसरी बनता सिंह याच्यासोबत झालेली त्यांची कुस्ती प्रचंड गाजली. त्यांनी बनता सिंह याला डाव दाखवत हिंदकेसरीची गदा आपल्या नावावर केली आणि कोल्हापूरचे नाव देशभर झळकले.

हिंदकेसरीची गजा 1959 मध्ये पटकावल्यावर त्याच वर्षी कराड येथे श्रीपती हंचनाळे यांची लढत आनंद शरगावकर यांच्यासोबत कराड येथे झाली. या लढतीत हंचनाळे यांनी अवघ्या दोन मिनीटांत शिरगावकर यांना अस्मान दाखवत महाराष्ट्र केसरी किताबही खिशात घातला. त्यानंतर त्यांनी 1958,1962 आणि 1965 मध्ये झालेल्या ऑल इंडिया चॅम्पियन स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि त्या जिंकल्याही.