Rain | (Photo credits: ANI)

पुणे (Pune) शहर आणि जिल्ह्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि मुसळधार पाऊस (Heavy Rain) या दोघांचाही बरसता सूर पाहायला मिळतो आहे. पावसाने आज पुण्यात हजेरी लावली. अचाकन मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. पुण्यात कोरोना व्हायरस संकटाचे आव्हानही वाढताना दिसत आहे. सुरुवातील हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असलेली कोरोना संक्रमितांची संख्या आता 3161 इतकी झाली आहे. तर, कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांच्या मृत्यूची सांख्या 170 इतकी आहे. कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आल्यावर उपचार घेऊन ठणठणीत बरे होऊन घरी परतलेल्यांची संख्याही 1197 इतकी आहे.

कोरोना व्हायरस संकटामुळे राज्याप्रमाणे पुण्यातही लॉकडाऊन आहे. त्यामुळे रस्ते, दुकाने बंद आहेत. या स्थितीमुळे शहरातील परिसर निर्मनूष्य पाहायला मिळत आहे. असे असले तरी, वाढत्या उन्हात सांडगे, पापड, कुरवड्या वाळत घातलेल्या आणि घरातील वस्तू उन्हात वाळत घातलेल्या लोकांची चांगलीच तारांबळ उडाली.

दरम्यान, शहरात लॉकडाऊन असला तरी जीवनावश्यक वस्तूंसह इतरही दुकाने सुरु करण्यास प्रशासनाने सशर्थ परवानगी दिली आहे. त्याचा फायदा घेत स्वीट होम, कपडे आदी दुकाने सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या दोन लॉकडाऊनमध्ये ही दुकाने पूर्णपणे बंद आहेत. तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये मात्र काहीशी शिथिलता देण्यात आली आहे. (हेही वाचा, महाराष्ट्रात पुढील 2 दिवसांत उष्णतेची लाट; 43°C पर्यंत तापमान वाढण्याची शक्यता)

एएनआय ट्विट

दरम्यान, पावसाळा सुरु होण्यास अद्याप बराच अवधी आहे. त्यामुळे अऩेक नागरिकांनी पावसापूर्वीची कामे आटोपण्यास सुरुवात केली आहे. यात घरांच्या, झोपड्यांच्या छताची कामे. घरांची स्वच्छता अशा कामांचा समावेश आहे. मात्र, पाऊस अचानक सुरु झाल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.