प्रतिकात्मक तस्वीर (Photo Credits: Twitter)

मुंबई पोलिसांनी शुक्रवारी असा दावा केला की,बीएआरसीचे माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांनी रिपब्लिक टीव्हीसह अन्य काही चॅनलच्या टारीआरपीमध्ये घोटाळा करण्यात प्रमुख भुमिका बजावली होती. याआधी रिपब्लिक मीडिया नेटवर्कने एक विधान जाहीर करत म्हटले होते की, पोलिसांचा आरोप हा हास्यास्पद आहे. तसेच तपासाचा एकमात्र मुद्दा हाच होता की रिपब्लिक टीव्हीला आपले लक्ष बनवायचे. रिपब्लिक टीव्हीचे मालकी हक्क रिपब्लिक मीडिया नेटवर्ककडे आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरुवारी 55 वर्षीय पार्थ दासगुप्ता यांना पुण्यातून अटक केली आहे. त्यावेळी ते पुणे येथून गोव्याकडे जाण्यासाठी निघाले होते. त्यांना शुक्रवारी मुंबईतील एका कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर येत्या 28 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी शुक्रवारी एका निवेदनात असे म्हटले की तेच प्रमुख सुत्रधार आहेत. पुढे त्यांनी असे ही म्हटले बीआरसीचे माजी मुख्य ऑपरेशन अधिकारी रोमिल रामगढिया यांची चौकशी केली. त्यामधून असे कळले की. दासगुप्ता हेच खोट्या टीआरपीच्या प्रकरणात सहभागी होते. रामगढिया यांना याआधी अटक करण्यात आली होती. दासगुप्ता 2012 ते नोव्हेंबर 2019 दरम्यान बीआरसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. रिपब्लिक मीडिया नेटवर्क कडून आम्ही कोणतेही चुकीचे काम केलेले नाही असे स्पष्टीकरण दिले गेले आहे. उलट त्यांनी असा दावा केला की, पोलिसांचे आरोप हास्यास्पद आहेत. तसेच मीडिया कंपनीने ही दावा केला की तपास खोटा असून त्याचे एकमेव उद्दिष्ट हे रिपब्लिक टीव्हीला निशाणा बनवणे आहे.(Arnab Goswami: अर्णब गोस्वामी यांच्याशी जवळीक महागात पडली, दोघे थेट निलंबित)

दासगुप्ता हे खोट्या टीआरपी प्रकरणी अटक करण्यात आलेले 15 वे व्यक्ती आहेत. यामधील बहुतांश आरोपी हे सध्या जामिनीवार आहेत. मुंबई पोलिसांनी बीआरसीच्या या तक्रारीसंदर्भात तपास सुरु केला असून काही चॅनलच्या द्वारे टीआरपी मध्ये घोटाळा केला जात आहे की नाही ते पाहिले जातेय.(TRP Rigging Scam: टीआरपी घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांकडून आरोपपत्र दाखल)

बीआरसीच्या एका फॉरेंसिग ऑडिट रिपोर्टचा हवाला देत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, प्रेक्षकांच्या डेटाची हेराफेरी जवळजवळ 2016 ते 2019 दरम्यान चालू होती. काही प्रकरणी रेटिंग सुद्धा आधीपासून ठरवण्यात आली होती.

पोलीस अधिकाऱ्यांनी दावा केला की, दासगुप्ता बीएआरसीचे सीईओ होते. पण ज्यावेळी प्रेक्षकांसंबंधित तक्रार आली त्यावेळी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. टीआरपीच्या आधारे प्रेक्षकांची संख्या किती आहे ते कळू शकते. ही गोष्ट अत्यंत महत्वाची असून यामुळे टीव्ही चॅनलला जाहिरात मिळण्यास मदत होते.