TRP Rigging Scam: टीआरपी घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांकडून आरोपपत्र दाखल
TV TRP | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कथीत टीआरपी घोटाळा (TRP Rigging Scam) प्रकरणात मुंबई येथील एका मजिस्ट्रेट न्यायालयात आरोपपत्र आज (मंगळवार, 24 नोव्हेंबर) दाखल केले. मुंबई पोलीसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (Crime Investigation Unit) सीआययू (ICU) ने टेलीव्हीजन रेटींग पॉइंट (TRP) घोटाळा (Television Rating Points Scam) घोटाळा प्रकरणात हे आरोपपत्र दाखल केले आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या गुन्हे अन्वेशन शाखेने आतापर्यंत या प्रकरणात रिपब्लिक टीवी (Republic TV) च्या वितरण प्रमुखासह 12 जणांना अटक केली आहे.

मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा गेल्या महिन्यात पुढे आणला होता. या प्रकरणा रेटिंग एजन्सी ‘ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च काउंसिल' (बार्क) ने ‘हंसा रिसर्च ग्रुप' च्या माध्यमातून एक तक्रार दाखल केली होती. यात काही टीव्ही चॅनल्स (वहिन्या) टीआरपीच्या आकड्यांमध्ये फेरफार करत आहेत. 'व्ह्यूअरशिप डेटा' (कोणते प्रेक्षक किती काळ कोणता चॅनल पाहात आहेत) जमा करण्याचे काम 'हंसा' कंपनीला देण्यात आले होते. (हेही वाचा, Television Rating Points: टीआरपी म्हणजे काय? दुरचित्रवाणी वाहिन्या खरोखर TRP गडबड करतात का? कोणाला कसा होतो फायदा?)

वाहिन्यांच्या एकूणअर्थकारणात टीआरपी (TRP) महत्त्वाचा मानला जातो. कारण, टीआरपीच्या माध्यमातून आलेल्या आकड्यांच्या आधारे वाहिन्यांना जाहीराती मिळत असतात. जाहीराती हा प्रसारमाध्यमांसाठी उत्पन्नाचा सर्वात प्रभावी असा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे जाहीरातदार आणि वाहिन्या टीआरपीच्या आकड्यांकडे खूप लक्ष देतात.

दरम्यान, मुंबई पोलीस कमिशनर परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी गेल्या महिन्यात दावा केला होता की, रिपब्लिक टीव्ही आणि बॉक्स सिनेमा आणि फक्त मराठी हे दोन चॅनल टीआरपी आकडेवारी फेरफार करण्यात आघाडीवर होते. दरम्यान, रिपब्लिक टीव्ही आणि इतर अन्य आरोपींनी अशा प्रकारच्या कोणत्याही फेरफार केल्याच्या आरोपाचे खंडण केले आहे.