TRP Scam: टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबईतून एकाला अटक, खात्यात मिळाली 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम
Representational Image (Photo Credits: Facebook)

TRP Scam: सध्या टीआरपी घोटाळ्याचे प्रकरण चांगलेच गाजत असून यामध्ये तीन चॅनल्सची नावे सुद्धा समोर आली आहेत. यामध्ये दोन मराठी चॅनल्स आणि रिपब्लिकन टीव्हीचे नाव सामील आहे. या प्रकरणी आता अधिक तपास केला जात आहे. याच पार्श्वभुमीवर टीआरपी घोटाळ्याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामधील आरोपी बोमापल्ली मिस्री याच्याकडे गेल्या एका वर्षापासून 1 कोटींहून अधिक रक्कम चार-पाच जणांकडून त्याच्या बँक खात्यात जमा केल्याची गोष्ट उघडकीस आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

मिस्री (45) याला गेल्या दीड वर्षांपासून एकाच मार्गाने उत्पन्न येत नव्हते. तर मिस्री याच्या कुटुंबातील लोकांना तीन चॅनल्स पाहण्याचे पैसे दिले गेले होते. मिस्री याच्या बँक लॉकरमधून 8.5 लाख रुपये मिळाले असून त्याचे खाते फ्रिज करण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या खात्यात 20 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.(Fake TRP Racket: खोट्या टीआरपी रॅकेट प्रकरणी दोन जणांना अटक; रिपब्लिकन चॅनलचे नाव तपासात पुढे आल्याची मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची माहिती)

पोलिसांनी या प्रकरणी अधिक माहिती देत असे म्हटले आहे की, गेल्या नोव्हेंबर पासून त्याच्या खात्यात 1 कोटी रुपयांहून अधिक पैसे जमा झाल्याची बाब समोर आली. हे पैसे प्रत्येक दोन महिन्यानंतर मिस्री याच्या बँक खात्यात जमा केले जात होते. त्याचसोबत प्रत्येक वेळी ही रक्कम 20 ते 25 लाखांच्या दरम्यान त्याच्या बँक खात्यात जमा केली जात होती. मिस्री याच्या खात्यात अशा पद्धतीने 5-6 वेळा पैसे ट्रान्सफर करण्यात आल्याचे दिसून आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.(Television Rating Points: टीआरपी म्हणजे काय? दुरचित्रवाणी वाहिन्या खरोखर TRP गडबड करतात का? कोणाला कसा होतो फायदा?)

खोट्या टीआरप्रकरणी रिपब्लिक टीव्ही, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा यांच्या बद्दल अधिक चौकशी आणि तपास करत आहेत. आरोपीवर असा ही आरोप लावला जात आहे की, त्याने कुटुंबांच्या घरात मीटर्स लावले असून त्यांनी हे तीन चॅनल्स पाहण्यास भाग पाडले जायचे. याची मदत टीआरपी वाढवण्यासाठी केली जात होती. मिस्री याच्या खात्यात ऐवढी रक्कम का जमा केली गेली याबद्दल आता अधिक तपास केला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.