Param Bir Singh New Mumbai Police Commissioner (pC - ANI)

Fake TRP Racket: मुंबई पोलिसांकडून खोट्या टीआरपी रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या खोट्या टीआरपी प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आल्याची स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचसोबत एक धक्कादायक खुलासा म्हणजे त्यात रिपब्लिकन चॅनलनचे नाव सुद्धा तपासात समोर आल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिली आहे. CNNN न्यूज18 यांनी ट्विटरवर परमवीर सिंह यांचा एक व्हिडिओ शेअर केला असून त्यांनी त्यात हा खुलासा केला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी या खोट्या टीआरपी प्रकरणी असे म्हटले आहे की, टीव्ही चॅनल हे पैसे देऊन टीआरपी मॅन्युपुलेटक करण्याचे काम करत होते. पोलिसांच्या मते रिपब्लिक टीव्ही सुद्धा अशाच पद्धतीने काम करतो. चॅनलचे डायरेक्टर यांच्या विरुद्धा कारवाई होण्याची शक्यता आहे.

परमवीर सिंह यांनी पुढे असे म्हटले आहे की, हा एक गुन्हा असून त्याला थांबवण्यासाठी आम्ही अधिक तपास करत आहोत. फॉरेंसिक एक्सपर्ट्स यांची ही मदत घेतली जात आहे. ज्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे त्या आधारावर पुढील कारवाई केली जाणार आहे. तसेच दोन लहान चॅनल त्यात फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा यांचा सुद्धा समावेश आहे. याचा मालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. ब्रीच ऑफ ट्रस्ट आणि फसवणुकीची केस दाखल करण्यात आली आहे.(Coronavirus Lockdown मध्ये दूरदर्शन TRP मध्ये अव्वल; रामायण, महाभारत या मालिकांमुळे प्रेक्षकांची डीडी नॅशनल चॅनलला पसंती)

रिपल्बिक टीव्ही चॅनमध्ये काम करणारी लोक, प्रमोटर आणि डायरेक्टर यांचा यामध्ये समावेश असण्याची शक्यता आहे. पुढील तपास सुरु आहे. ज्या लोकांनी जाहिराती दिल्या त्यांची सुद्धा चौकशी केली जाणार आहे. त्यात त्यांच्यावर दबाव होता का असा प्रश्न सुद्धा उपस्थितीत केला जाऊ शकतो.

रॅकेट कसे काम करायचे?

परमवीर सिंह यांनी एक मोठे रॅकेट हाती लागल्याचे म्हटले. हे रॅकेट खोट्या  टीआरपी संबंधित आहे. टेलिव्हिजन वरील जाहिरातीची इंडस्ट्री ही जवळजवळ 30 ते 40 हजार कोटी रुपयांची आहे. जाहिरातींचा दर टीआरपीच्या आधारावर ठरवला जातो. कोणत्या चॅनलला कोणत्या प्रकारे जाहिरात मिळणार हे ठरवले जाते. पण जर टीआरपीमध्ये काही बदल झाल्यास त्याच्या उत्पन्नावर मात्र परिणाम होते. परंतु काही जणांना याचा फायदा तर काहींचे नुकसान होते.

टीआरपीची मोजणी करण्यासाठी एक BARC संस्था आहे. जी विविध शहरात बॅरोमीटर लावतात. देशात जवळजवळ 30 हजार बॅरोमीटर लावण्यात आले आहेत. मुंबईत 10 हजार बॅरोमीटर लावले गेले आहेत. बॅरोमीटर इंस्टॉल करण्याचे काम मुंबईतील हंसा नावाच्या संस्थेला दिले होते. तपासात अशी गोष्ट समोर आली की, काही जुने कामगार जे हंसासोबत काम करत होते ते टेलिव्हिजन चॅनलसोबत डेटा शेअर करत होते. ते लोकांना सांगायचे की, तुम्ही जरी घरी असाल किंवा नसल्यास चॅनल सुरुच ठेवा. यासाठी त्यांना पैसे सुद्धा दिले जात होते. काही व्यक्ती अशिक्षित आहेत त्यांच्या घरी इंग्रजी चॅनल सुरु केले जात होते.

हंसाच्या माजी कामगारांना आता ताब्यात घेण्यात आले आहे. याच आधारावर तपास अधिक वाढवण्यात आला. दोन लोकांना अटक करत कोर्टात हजर करण्यात आले. या दोन्ही आरोपींना 9 ऑक्टोंबर पर्यंत तुरुंगाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचसोबत काही जणांचा अद्याप तपास केला जात आहे. काही मुंबईसह बाहेरील ही आहेत. चॅनेल प्रमाणे ते पैसे द्यायचे. एका व्यक्तिला अटक करण्यात आली आहे त्याच्या खात्यातून 20 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. तसेच आठ लाखांची रोकड ही हस्तगत केली आहे.