'Anti- Coronavirus गादीवर झोपून कोरोना पळवा' भिवंडी येथे खोट्या जाहिरातीचा प्रसार केल्याप्रकरणी एका कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल

सध्या कोरोना व्हायरस (Coronavirus) संपूर्ण जगात थैमना घातल असल्याचे आपणांस पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसची लागण आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर लाखो लोकांचा कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक कंपन्या नागरिकांची लूट करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी बाजारात बनावट सॅनिटायझरची विक्री होत असल्याची बातमी आपल्या कानावर पडली होती. यातच भिवंडी (Bhiwandi) येथेही अरिहंत मेट्रेस नावाच्या कंपनीने ऍन्टी कोराना व्हायरस गादीची खोटी जाहिरात करुन लोकांची फसवणूक केल्याचे समजत आहे. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून नागरिकांना कोणत्याही अफवा आणि जाहिरातीच्या आहारी जाऊ नये, असे आवाहन केले आहे.

जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. हा कोरोना राज्यातही धडकला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 43 जण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. कोरोनाचे प्रमाण कमी व्हावे किंवा त्याचा नायनाट व्हावा यासाठी सरकार आणि सर्वसामान्य प्रयत्न करत आहेत. मात्र, सर्वसामान्यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन भिवंडीत गादी विक्रेत्याने 'कोरोनापासून बचाव करणारी गादी',अशी खोटी जाहीरात करुन लोकांची फसवणूक केली. संबंधित गादी विक्रेत्याने ऍन्टी करोना व्हायरस मेट्रेस' ही 15 हजार रुपयांची गादी विक्रीस आणली. त्यावर झोपल्यास करोनाचा प्रादुर्भाव होत नाही, अशी फसवी जाहिरात ‘मुंबई समाचार’ या गुजराती दैनिकात 13 मार्चच्या अंकात प्रकाशित केली आहे. स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब डावखरे यांच्या तक्रारीवरुन गादी विक्रेत्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अरिहंत मेट्रेसचे मालक अमर पारेखच्या विरोधात कलम 505 [2(ब)] सह आपत्ती व्यावस्थापन कायदा 2005 चे कलम 52, औषधी द्रव्य आणि तिलस्मी उपचार (आक्षेपार्ह जाहिरात) अधिनियम 1954 चे कलम 3, 4, 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे देखील वाचा- Coronavirus: कोरोना व्हायरसबाबात व्हॉट्सऍपवर खोट्या माहितीचा प्रसार करणे पडले महागात; नाशिकमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल

ट्वीट-

जगभरात कोरोना व्हायरसमुळे लोकांच्या मनात चांगलीच भीती पसरत असल्याचे पाहायला मिळत आहेत . दरम्यान आता या व्हायरसपासून बचावण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे याकडे नागरिकांचा कल आहे. पण या भीतीचा गैरफायदा घेत मुंबईमध्ये काही कंपनींकडून बनावट हॅन्ड सॅनिटायझर बनवणाऱ्यांवर गेल्या काही दिवसांपूर्वी कारवाई करण्यात आली होती. Biotol असं या प्रोडक्टचे नाव असून सुमारे ₹1,15,000 माल जप्त करण्यात आला आहे. कांदिवली पाठोपाठ अजून ठिकाणी एफडीए कडून धाड टाकण्यात आली असून त्यामध्ये बनावट हॅन्ड सॅनिटायझर जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये Biotol आणि WIZ यांचे 1,78,800 रूपयांचे प्रोडक्ट्स जप्त करण्यात आले होते.