डॉ. अमोल कोल्हे (प्रतिमा सैजन्य- लोकसभा)

Amol Kolhe On No Confidence Motion Speech: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) खासदार अमोल कोल्हे यांनी विरोधकांनी संसदेत दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर बोलताना 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' असा संतप्त सावल उपस्थित केला. हा प्रस्ताव मणिपूर हिंसाचार (Manipur Violence) प्रकरणी दाखल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार विकास झाल्याचा आणि मोठी अर्थव्यवस्था झाल्याचे सांगते. मात्र, दरडोई उत्पन्न किती वाढले? यावर मात्र मौन बाळगते. कृषी क्षेत्रात मोठा विकास झाल्याचे हे सरकार सांगते मात्र, शेतीसाठी लागणारे खत, कीटकनाशकं, औषधे याच्या किमतीही किती मोठ्या प्रमाणात वाढल्या यावर मौन बाळगले जाते. त्यामुळे मोदी सरकारची कार्यपद्धतीन पाहून महात्मा गांधी यांची तीन माकडे आठवतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

महात्मा गांधी यांची तीन माकडे

सरकारची कार्यपद्धतीन पाहून महात्मा गांधीजी यांच्या तिन माकडांची आठवण येते. सरकारविरोधात काही ऐकू नका, निवडणुका सोडून काहीही पाहू नका, सरकार विरोधात बोलणाऱ्यांचा आईस करु त्यांची बोलती बंद करो. या सरकारवर कसा विश्वास ठेवावा. जे महागाईवर बोलत नाही, बेरोजगारीवर नाही बोलत, विकासाचे आकडे सरकार फेकते पण दरडोई उत्पन्नावर बोलत नाही, असा सावल करताना अमोल कोल्हे म्हणाले,  देशाची आर्थव्यवस्था जेव्हा पाचव्या क्रमांकावर असल्याचे बोलले जाते तेव्हा दरडोई उत्पनात देश 141 व्या स्थानावर पोहोचल्याचे पाहायला मिळते. याचा अर्थ देशाची संपत्ती काही चार पाच उद्योगपतींच्या हातात सामावली आहे का? असा सवाल उपस्थित होतो. इथे अर्थमंत्री शेतकरी सन्मान केल्याच्या गोष्टी करतात. पण शेतीचे खत, किटकनाशकं याच्या किमती दुप्पट, तिप्पट झाल्यावर ते काहीच बोलत नाहीत. अर्थमंत्री आता टॉमॅटोला दर आल्याचे सांगतात. पण पाठमागील काही महिन्यांपासून शेतकरी टोमॅटो रस्त्यांवर फेकतात तेव्हा त्यांचे आश्रू पुसण्यासाठी कोण आलं होतं. (हेही वाचा, पंतप्रधान Narendra Modi संसदेत अविश्वास प्रस्तावाला आज देणार उत्तर)

व्हिडिओ

'लोकमान्य टिळक पुरस्कार मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकताच लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. मात्र, लोकमान्य टिळक यांच्याच शब्दात मी प्रश्न विचारु इच्छितो, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय? याचेही आत्मचिंतन होणे आवश्यक आहे.