Who Is Paramatman: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे केवळ अमित शाह आणि गौतम अदानी यांचेच ऐकतात असा घणाघात राहुल गांंधी यांनी लोकसभेत केला. त्यानंतर आता राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे (Mallikarjun Kharge) यांनीही जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी सभागृहात नियम 176 अन्वये मणिपूर हिंसाचार प्रकरणावर चर्चेची मागणी केली. त्याला सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) सदस्यांनी तीव्र विरोध दर्शवला तर विरोधकांनी समर्थन दर्शवले. त्यामुळे सभागृहात एकच गदारोळ झाला आणि सभापतींना सभागृह दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करावे लागले. Narendra Modi not
राज्यसभेत नेमके काय घडले?
सभागृहाचे कामकाज आज सकाळी सुरु होतातच मल्लिकार्जून खडगे यांनी नियम 176 अन्वये मणिपूर मुद्द्यावर चर्चा मागितली. त्यावर सभापती जगदीप धनखड यांनी सांगितले की, त्यांना या विषयावर चर्चा करण्यासाठी नोटीस 48 मिळाली आहे. जी नियमाला धरुन नाही. त्यामुळे ती स्वीकारण्यात आली नाही. अशा प्रकारे चर्चेसाठी या प्रकरणी अल्पकालिन चर्चेसाठी नियम 19 आणि नियम 167 अन्वये नोटीस मिळाली आहे. दरम्यान, सभागृह नेते पीयुष गोयल यांनी म्हटले की, विरोधी पक्षातील चार नेत्यांकडून मला भेटीसाठी प्रस्ताव आला होता. विरोधी पक्षनेत्याच्या दालनात त्यबद्दल चर्चाही झाली. पण, एक नेता आला आणि मला विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात चर्चा करता येणारनाही, असे सांगू लागला. यावरुन त्यांची मानसिकता समजते. गोयल यांच्या वक्तव्याचा काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी तीव्र विरोध केला.
दरम्यान, मल्लीकार्जून खडगे यांनी म्हटले की, सभागृह नेते त्यांच्या दालनात आले होते. त्यांनी कोणत्याही प्रकारे नियम 176 अन्वये मणिपूर मुद्द्यावर चर्चा करु इच्छित होते. त्यांनी म्हटले की, त्यासाठी पूर्ण वेळ दिला जाईल. खडगे यांनी पुढे म्हटले की, आम्ही पंतप्रधानांच्या उपस्थितीत मणिपूर विषयावर चर्चा मागतो आहोत. ज्याचा भाजपने विरोध केला. त्यावर संतप्त होत खडगे यांनी म्हटले की, पंतप्रधान हे काही भगवान किंवा परमात्मा नाहीत. त्यांनी या विषयावर बोलायला हवे. त्यानंतर सभागृहात एकच गदारोळ झाला. ज्यामुळे सभापतींनी सभागृह तहकूब केले.