Image used for represenational purpose (File Photo)

दारु पिताना झालेल्या किरकोळ वादातून एका 18 वर्षीय युवकाची हत्या (Murder) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना अंबरनाथ (Ambernath) येथील कुटीर परिसरात आज घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी आरोपी मित्राला अटक केली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने अंबरनाथ परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत आणि आरोपीमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी किरकोळ वाद झाला होता. मात्र, शुक्रवारी पुन्हा यांच्यात वाद झाला. यातूनच हत्या झाल्याचे समजत आहे.

आशुतोष कराळे असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. आशुतोष आणि अमन शेख हे दोघेही मित्र असून अंबरनाथ येथील दत्त कुटीर परिसरात राहत होते. आशुतोष आणि अमन यांच्या गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी भांडण झाले होते. परंतु, त्यावेळी हे भांडण मिटवले गेले. मात्र, शुक्रवारी दारु पित असताना या दोघांत पुन्हा वाद झाला. त्यावेळी अमनने आशुतोषला 'तू घरी जा' असे म्हणाला. याचा आशुतोषला राग आला आणि त्याने अमनच्या पोटात चाकू खुपसला. यात अमनचा जागीच मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा- पुणे: 9 वर्षीय चिमुरडीचा बापाकडून विनयभंग; POCSO Act अंतर्गत आरोपी अटकेत!

याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आशुतोषला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच वरिष्ठ पोलीस निरिक्षक मंजितसिंग बग्गा या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत, अशी माहिती एका मराठी वेबसाईटवर देण्यात आली आहे.