Molestation| File Photo

महाराष्ट्रामध्ये पुणे शहरात बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. 9 वर्षीय चिमुरडीचा तिच्या वडिलांनी कथित विनयभंग (Molestation) केल्याची घटना समोर आली आहे. या विनयभंगच्या घटनेनंतर आरोपी बापाला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान ANI Tweet च्या माहितीनुसार, आरोपीवर POCSO Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील बारामती डिव्हिजनचे डीएसपी नारायण शिरगावकर(Narayan Shirgaonkar)यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनयभंग करणार्‍या बापाला अटक करण्यात आली आहे. गुन्हा दाखल केलेला असून संबंधित गुन्ह्याबाबत कलम आणि POCSO Act अंतर्गत आरोपीला अटक झालेली आहे.

ANI Tweet

दरम्यान आजच केंद्रीय गृहमंत्रालयाने महिलांवरी वाढते अत्याचार पाहता आता नवी नियमावली जारी केली आहे. यामध्ये केंद्रीय गृह मंत्रालय आणि महिला बाल विकास मंत्रालय यांनी एकत्रितपणे पोलिस स्टेशनमध्ये महिला साहाय्यता डेस्क आणि अँटी ह्युमन ट्रॅफिकींग यूनिटची स्थापना केली आहे. महिला सक्षमीकरणासाठी निर्भया फंडच्या आधारे 100 कोटींचा निधी मंजूर केला आहे. सोबतच ही नवी योजना देशभर लागू असेल असेदेखील सांगितले आहे. नक्की वाचा:  Crimes Against Women: महिलांवरील वाढत्या अत्याचाराला चाप बसवण्यासाठी गृह मंत्रालयाने जारी केली नवी नियमावली.

काही दिवसांपूर्वीच हाथरस मध्ये 19 वर्षीय दलित मुलीवर सवर्ण 4 पुरूषांकडून बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. तेव्हापासून पुन्हा महिला आणि मुलींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.