प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: Unsplash.com)

हॉस्पिटलमध्ये आजारी रूग्णाला पुन्हा आरोग्यदायी करण्यासाठी देवानंतर आपण कुणावर विश्वास ठेवतो ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर. पण महाराष्ट्र मेडिकल काऊंसिलकडून ( Maharashtra Medical Council ) समोर आलेल्या धक्कादायक गोष्टीमुळे शिक्षणव्यवस्थेचा भोंगळ कारभार पुन्हा समोर आला आहे. 2014-2015 या बॅचमधील तब्बल 57 'बोगस डॉक्टर' खोट्या पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीचा (Post Graduation Degree) वापर करून काऊन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन मिळवून डॉक्टर म्हणून काम करत आहेत.

काऊंसिलकडून सार्‍या 57 डॉक्टरांचे लायसन्स मागे घेण्यात आले असून त्यांच्याविरूद्ध ऑक्टोबर 2018 मध्ये FIR करण्यात आले आहे. मुंबईच्या College of Physicians & Surgeons (CPS)चे हे डॉक्टर विद्यार्थी 2014-15 या बॅचचे आहेत.

चौकशीतून समोर आलं धक्कादायक वास्तव

पोलिस चौकशीमधून समोर आलेल्या माहितीनुसार, खोटी प्रमाणपत्र देण्यासाठी सुमारे 3-5 लाख रूपये प्रत्येक विद्यार्थ्याकडून घेतले जात असे. यामध्ये जर विद्यार्थी परिक्षेमध्ये नापास झाले तर त्यांना पास करण्याची सोय देखील होती. काही विद्यार्थी MMC सोबत असल्याने त्यांना महाराष्ट्रामध्ये खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे प्रॅक्टिस करण्याची परवानगी होती.

बोगस डॉक्टरांचं महाराष्ट्रामधील हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आल्यानंतर CPS आणि MMC

या दोन्ही संस्था एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. लायसन्स मिळवण्यासाठी MMC कडून 78 बोगस डॉक्टरांना मदत करण्यात आली आहे. त्यांच्या खोट्या प्रमाणपत्रांचा खुलासा होण्याआधी सुमारे 3-4 वर्ष ते काम करत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.